AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Love Life : करीनामुळे सुरु झाली रणवीर – दीपिका यांची ‘लव्हस्टोरी’, कोणाला नाही माहिती प्रेमामागची केमेस्ट्री

Love Life : अनेक वर्षांनंतर समोर आलं रणवीर सिंग - दीपिका पादुकोन यांच्या नात्याचं सत्य, करीना कपूर हिच्यामुळे अभिनेत्याला भेटील त्याच्या स्वप्नातली 'ड्रीमगर्ल'... आज दोघे एकत्र घेत आहेत वैवाहिक आयुष्याचा आनंद... सध्या सर्वत्र दीपिका - रणवीर यांच्या प्रेमाची चर्चा

Love Life : करीनामुळे सुरु झाली रणवीर - दीपिका यांची 'लव्हस्टोरी', कोणाला नाही माहिती प्रेमामागची केमेस्ट्री
| Updated on: Oct 27, 2023 | 11:19 AM
Share

मुंबई : 27 ऑक्टोबर 2023 : प्रत्येक ‘लव्हस्टोरी’मागे काहीतरी खास गोष्ट असते. प्रत्येक लव्हस्टोरीची एक केमेस्ट्री असते… बॉलिवूड सेलिब्रिटी कायम त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगतात आणि चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. सध्या अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांच्या लव्हस्टोरीची चर्चा रंगत आहे. दीपिका हिने लग्नाआधी अनेक सेलिब्रिटींना डेट केलं. अभिनेत्रीने डिप्रेशनचा देखील सामना केला. पण अखेर दीपिका हिच्या आयुष्यात रणवीर सिंग याची एन्ट्री झाली आणि सर्वकाही बदललं. रणवीर याने दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये प्रेमाची सुरुवात कशी झाली याबद्दल सांगितलं आहे.

रणवीर याने सांगितलं की, त्याच्या आणि दीपिका हिच्या नात्याची सुरुवात ‘गोलियों की रासलीला राम लीला’ सिनेमापासून झाली. ‘सिनेमात माझ्यासोबत अभिनेत्री करीना कपूर झळकणार होती. पण काही कारणांमुळे तिने सिनेमा करण्यास नकार दिला. तेव्हा दिग्दर्शक संजय लिला भंसाळी आणि मी चर्चा करत होतो, सिनेमात कोणत्या अभिनेत्रीला घ्यायचं..’

पुढे अभिनेता म्हणाला, ‘तेव्हा दीपिका हिचा ‘कॉकटेल’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. तर मिटिंगसाठी मी दीपिका हिच्या आधी संजय यांच्या घरी पोहोचलो. संजय यांचं घर समुद्र किनारी आहे. काही वेळाने घराचा दरवाजा उघडला आणि दीपिका चिकनकारी ड्रेसमध्ये घरात आली… दीपिका समोर आल्यानंतर मी तिच्याकडे पाहातच राहिलो…’

‘दीपिका, संजय लिला भंसाळी यांच्या घरी आली. सिनेमावर चर्चा झाली. आम्ही एकत्र जेवण केलं… त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आम्ही एकमेकांना भेटू लागलो…’ सांगयचं झालं तर, करीना हिने सिनेमाला नकार दिल्यामुळे दीपिका हिला ‘गोलियों की रासलीला राम लीला’ सिनेमात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

‘गोलियों की रासलीला राम लीला’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान रणवीर आणि दीपिका यांच्यामध्ये प्रेम बहरलं… आज रणवीर आणि दीपिका त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. महत्त्वाचं म्हणजे, रणवीर कामय त्याच्या अनोख्या अंदाजात दीपिका हिच्यावर असलेलं प्रेम व्यक्त करत असतो.

सोशल मीडियावर देखील रणवीर आणि दीपिका यांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. शिवाय रणवीर आणि दीपिका दोघेही सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?