AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranveer Singh : रणवीर सिंहवर बॉलिवूडमध्ये खरंच ‘बंदी’? ‘धुरंधर’सोबत कोणीच करणार नाही काम? ‘डॉन 3’च्या वादाची A टू Z माहिती..

अभिनेता रणवीर सिंह विरुद्ध फरहान अख्तरचा जो वाद सुरू आहे, त्याविषयी A टू Z माहिती या लेखात वाचू शकता. 'डॉन 3' या चित्रपटातून माघार घेणं रणवीरला इतकं महागात का पडलं आणि त्याच्यासमोर आता काय पर्याय आहेत, ते जाणून घ्या..

Ranveer Singh : रणवीर सिंहवर बॉलिवूडमध्ये खरंच 'बंदी'? 'धुरंधर'सोबत कोणीच करणार नाही काम? 'डॉन 3'च्या वादाची A टू Z माहिती..
Ranveer Singh and Farhan Akhtar, don 3 disputeImage Credit source: Instagram
| Updated on: May 29, 2026 | 3:10 PM
Share

अभिनेता रणवीर सिंह आणि ‘डॉन 3’ या चित्रपटावरून सुरू असलेला वाद गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिय सिने एम्प्लॉइजने (FWICE) रणवीरविरोधात असहकाराचा आदेश जारी केला असून चाहत्यांनी यावरून विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. फेडरेशनने जारी केलेले असहकाराचे निर्देश नेमके काय असतात, एखाद्या कलाकारावर त्याचा फटका कसा बसतो, हे निर्देश कधी उठवले जातात आणि कोणत्या प्रकरणांमध्ये ते जारी केले जातात, यासंदर्भातील प्रत्येक गोष्ट सविस्तर जाणून घेऊयात..

प्रकरणाची सुरुवात

2023 मध्ये फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या ‘एक्सेल एंटरटेनमेंट’ या निर्मिती संस्थेनं ‘डॉन’ फ्रँचाइजीमधील तिसऱ्या ‘डॉन 3’ या चित्रपटाची घोषणा केली. या फ्रँचाइजीच्या पहिल्या दोन चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तर तिसऱ्या भागात रणवीर सिंहची ‘डॉन’च्या भूमिकेसाठी निवड झाली होती. तर अभिनेत्रींमध्ये कियारा अडवाणीला मुख्य नायिकेसाठी निवडण्यात आलं होतं. पण कियाराने माघार घेतल्यानंतर तिची जागा क्रिती सनॉनने घेतली. याव्यतिरिक्त विक्रांत मेस्सीला मुख्य खलनायक म्हणून निवडण्यात आलं होतं. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, त्यानेही या प्रोजेक्टमधून माघार घेतली.

रणवीरची माघार

सर्व कलाकारांच्या वेळांची जुळवाजुळव करण्यासह इतर काही कारणांमुळे या चित्रपटाला वारंवार विलंब होत गेला. त्यातच रणवीर आणि निर्मात्यांमध्ये काही क्रिएटिव्ह गोष्टींवरून मतभेद झाले. रणवीरला डॉनची भूमिका अधिक डार्क आणि आक्रमक हवी होती, परंतु फरहानला हे मान्य नव्हतं, असं म्हटलं जातंय. याच मतभेदांच्या पार्श्वभूमीवर रणवीरने अचानक या चित्रपटातून माघार घेतली. त्याच्या या निर्णयामुळे निर्मात्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. नुकसानीचा हा आकडा 40 ते 45 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं कळतंय.

रणवीरकडून नुकसान भरपाईची मागणी

फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी झालेल्या नुकसानीबद्दल रणवीरकडे जवळपास 40 ते 45 कोटी रुपयांची मागणी केली. कारण रणवीर बाहेर पडल्यानंतर ‘डॉन 3’चं काम अचानक थांबलं. मात्र रणवीरने नुकसान भरपाई देण्यास नकार दिला. त्याऐवजी त्याने फरहान आणि रितेशला एका सीक्रेट डीलची ऑफर दिल्याचं म्हटलं गेलं. रणवीरकडून एक्सेल एंटरटेन्मेंटला 35 कोटी रुपयांची एक मोठी ऑफर देण्यात आली होती. यामध्ये अशी डील होती की रणवीर हा फरहान आणि इतरांना 10 कोटी रुपये परत करणार. त्याचसोबत एक्सेल एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली भविष्यात त्याच्यासोबत बनणाऱ्या कोणत्याही चित्रपटावर 25 कोटी रुपयांची सूटसुद्धा देण्यात येईल.

फरहानने रणवीरची ही डील नामंजूर करत हा वाद प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाकडे नेला. जिथे आमिर खान आणि हृतिक रोशन यांच्यासह इतर कलाकारांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी ‘डॉन 3’च्या टीमसोबत चर्चा केली. नंतर एप्रिल 2026 मध्ये फरहानने FWICE कडे तक्रार दाखल केली. 25 मे 2026 रोजी FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी रणवीर सिंहविरोधात असहकाराचे निर्देश जारी केल्याचं जाहीर केलं.

Fwice ने खरंच रणवीर सिंहवर बंदी घातली आहे का?

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने रणवीर सिंहवर तीन वर्षांची ‘बंदी’ घातल्याची बातमी प्रकाशित झाल्याने मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली. पण रणवीरवर बंदी घातलेलीच नाही, असं फेडरेशनचे मुख्य सल्लागार आणि निर्माते अशोक पंडित यांनी स्पष्ट केलं. “आम्ही कोणत्याही पत्रकार परिषदेमध्ये बंदी असा शब्दप्रयोग केलेला नाही. मीडियाने या शब्दाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला. आम्ही फक्त नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह जारी केलं आहे”, असं ते म्हणाले.

नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह म्हणजे नेमकं काय?

नॉन कोऑपरेशन डायरेक्टिव्ह म्हणजे ‘असहकारा’चे निर्देश. समजावून सांगूनही समोरची व्यक्ती समजून घेत नसल्यास त्याच्या विरोधात नॉन कोऑपरेशन डायरेक्टिव्ह जारी केलं जातं. FWICE संघटनेचे तब्बल साडेचार लाख सदस्य आहेत. यामध्ये लाइटबॉयपासून, मेकअपमनपर्यंत वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करणाऱ्या सदस्यांचा समावेश आहे. त्यांना रणवीरच्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करू नये, असं सांगितलं आहे. पण कोणावरही रणवीरसोबत काम न करण्याची सक्ती नाही, असंही अशोक पंडित यांनी म्हटलंय.

हे पहिल्यांदाच घडलंय का?

फेडरेशनने अशा पद्धतीने थेट नॉन-ऑपरेशनचे डायरेक्टिव्ह पहिल्यांदाच जारी केलेले नाहीत. पण ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ या दोन्ही चित्रपटांनंतर रणवीर सिंहभोवती निर्माण झालेला वलय पाहता, या गोष्टीची सर्वाधिक चर्चा होत आहे. याआधी निर्माते फिरोज नाडियादवाला यांच्याविरोधातही नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह जारी करण्यात आले होते. त्यांनी पैसे परत दिल्यावर काम पुन्हा सुरू झालं होतं. असं इतरही काही कलाकारांच्या बाबतीत घडलं आहे. पण नॉन-ऑपरेशन डायरेक्टिव्ह ही शेवटची पायरी असते. फेडरेशनने रणवीरला त्याची बाजू मांडण्यासाठी दर दहा दिवसांनी असे तीन नोटीस बजावले होते. मात्र या नोटिशींना रणवीरकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नव्हता.

रणवीर सिंहची प्रतिक्रिया

रणवीरच्या प्रवक्त्याने या संपूर्ण प्रकरणी त्याची बाजू मांडत स्पष्ट केलं, “या चित्रपटसृष्टीचा आणि डॉन फ्रँचाइजीशी संबंधित प्रत्येक व्यक्तीचा रणवीर खूप आदर करतो. याप्रकरणी त्याने जाणूनबुजून मौन बाळगलं होतं, कारण त्याच्या मते व्यावसायिक संवाद आणि वैयक्तिक नात्यांना प्रतिष्ठा, परिपक्वता आणि एकमेकांच्या सन्मानानेच सांभाळलं पाहिजे. वेळोवेळी त्याच्याबद्दल विविध चर्चा झाल्या, अंदाज व्यक्त करण्यात आले, पण रणवीरने कधीच सार्वजनिकरित्या उत्तर देण्याला किंवा अंदाजांना अधिक हवा देणं गरजेचं मानलं नाही. त्याचं संपूर्ण लक्ष कामावर आणि आगामी प्रोजेक्ट्सवर आहे. डॉन चित्रपटाच्या फ्रँचाइजीशी संबंधित सर्व लोकांचा तो आदर करतो आणि डॉन 3 या चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा देतो. अशा काळात धैर्याने वागण्याचा आणि शांतीपूर्ण राहण्याचा त्याचा निर्णय असून यापुढेही तो हेच करणार आहे.’

FWICE चे निर्देश कायदेशीररित्या बंधनकारक आहेत का?

थोडक्यात याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. FWICE ही एक कामगार संघटना म्हणून नोंदणीकृत आहे. पण ती न्यायिक संस्था नाही. या संस्थेला कायदेशीररित्या कोणावरही बंदी घालण्याचा अधिकार नाही. संस्थेच्या निर्देशाचं उल्लंघन करणाऱ्या सदस्यावर फक्त अंतर्गत युनियन शिस्तभंगाची कारवाई केली जाते.

रणवीर या निर्देशाला न्यायालयात आव्हान देऊ शकतो का?

रणवीर अर्थातच या निर्देशाला न्यायालयाला आव्हान देऊ शकतो, कारण तसं करण्यासाठी त्याच्याकडे सबळ कारणं आहेत. रणवीर FWICE वर अधिकारक्षेत्र असलेल्या मुंबई उच्च न्यायालयात जाऊन त्या निर्देशाविरुद्ध मनाई हुकूम मागू शकतो.

Follow Us
मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब कोणता पक्ष किती जागा लढवणार
मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब कोणता पक्ष किती जागा लढवणार.
14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक
14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक.
महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला फायनल; कोणाच्या वाट्याला किती जागा?
महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला फायनल; कोणाच्या वाट्याला किती जागा?.
राज्यसभेवर भुजबळांची नजर?; तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली
राज्यसभेवर भुजबळांची नजर?; तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली.
पुण्यात विषारी दारूकांडाचा थरार! मुख्य आरोपी अखेर जेरबंद
पुण्यात विषारी दारूकांडाचा थरार! मुख्य आरोपी अखेर जेरबंद.
एकामागून एक मृत्यू… पुण्यातील विषारी दारूकांडावर फडणवीसांचा मोठा इशारा
एकामागून एक मृत्यू… पुण्यातील विषारी दारूकांडावर फडणवीसांचा मोठा इशारा.
दादा मी येतोय; प्रसाद लाडांची जरांगेंना भावनिक साद, आता तोडगा निघणार
दादा मी येतोय; प्रसाद लाडांची जरांगेंना भावनिक साद, आता तोडगा निघणार.
एसीत सरकार, उन्हात मराठा समाज; जरांगेंचा सरकारला अखेरचा इशारा....
एसीत सरकार, उन्हात मराठा समाज; जरांगेंचा सरकारला अखेरचा इशारा.....
शेलू-नेरळदरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत; उद्यान एक्सप्रेससह अनेक गाड्या
शेलू-नेरळदरम्यान रेल्वे सेवा विस्कळीत; उद्यान एक्सप्रेससह अनेक गाड्या.
मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी OBC महासंघ रणांगणात; सरकारची डोकेदुखी वाढली
मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी OBC महासंघ रणांगणात; सरकारची डोकेदुखी वाढली.