AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranveer Singh | शाहरुख खानची जागा घेतल्याने रणवीर सिंह नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, अखेर ट्रोलिंगवर अभिनेत्याचे मोठे भाष्य

बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंह याचा नुकताच चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणवीर सिंह हा दिसला होता. रणवीर सिंह याचा काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला सर्कस हा चित्रपट फ्लाॅप गेला. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठी अपेक्षा नक्कीच होती.

Ranveer Singh | शाहरुख खानची जागा घेतल्याने रणवीर सिंह नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, अखेर ट्रोलिंगवर अभिनेत्याचे मोठे भाष्य
| Updated on: Aug 10, 2023 | 5:28 PM
Share

मुंबई : डॉन 3 चित्रपटामध्ये आता बाॅलिवूडचा अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुपरहिट फ्रेंचाइजी डॉनचे आता नवे युग सुरू झाले आहे. अगोदर अमिताभ बच्चन नंतर शाहरूख खान (Shah Rukh Khan) आणि आता रणवीर सिंहला ही संधी मिळाली आहे. इतकेच नाही तर नुकताच डॉन 3 चे टीझर देखील रिलीज करण्यात आले आहे. मात्र, शाहरुख खान हा डॉन 3 (Don 3) मध्ये दिसणार नसल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी निराशा ही बघायला मिळत आहे.

शाहरुख खान याचे चाहते सोशल मीडियावर संताप व्यक्त करताना देखील दिसत आहेत. डॉन 3 मध्ये शाहरुख खान हा दिसणार नसल्याने चाहते फक्त संताप व्यक्त करत नाहीयेत तर रणवीर सिंह याला टार्गेट करताना देखील दिसत आहेत. अनेकांनी डॉन 3 मध्ये रणवीर सिंह हा दिसणार असल्याचे कळाल्यापासून नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली.

सोशल मीडियावर रणवीर सिंह विरोधात लोकांचा रोष वाढत आहे. शेवटी आता यावर रणवीर सिंह याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. इतकेच नाही तर या पोस्टसोबतच रणवीर सिंह याने आपले लहानपणीचे दोन फोटो देखील शेअर केले आहेत. या पोस्टच्या माध्यमातून रणवीर सिंह हा आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहे.

या पोस्टमध्ये त्याने शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचा उल्लेख देखील केला. रणवीर सिंह याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, भगवान…यासाठी मी गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहत होतो. इतरांप्रमाणेच लहानपणापासून मला चित्रपट प्रचंड आवडतात मी चित्रपटांच्या प्रेमात पडलो होता.

अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान मला आवडतात, ते हिंदी चित्रपटसृष्टीचे G.O.A.T आहेत. मी त्यांच्यासारखे बनण्याचे स्वप्न पाहत मोठा झालो. अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांना पाहूनच मी मोठा झालो. मी आज जसाही व्यक्ती आणि अभिनेता आहे तो त्यांच्यामुळेच. त्याचा वारसा पुढे नेणे हे माझे लहानपणीचे स्वप्न आता पूर्ण होत आहे.

डॉनचा भाग होणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आणि मोठी जबाबदारी नक्कीच आहे. मला यासाठी संधी मिळाली हिच मोठी गोष्ट आहे. पुढे रणवीर सिंह हा फरहान आणि रितेश यांचे धन्यवाद मानताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह याचे चित्रपट फ्लाॅप जाताना दिसत आहेत. सर्कस हा चित्रपट देखील रणवीर सिंह याचा फ्लाॅप गेला.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान