Ranveer Singh : मोठा ट्विस्ट ! रणवीर सिंहवर इंडस्ट्रीचा बॅन नाहीच? फक्त… FWICE चा मोठा दावा काय?
'डॉन 3' मधून रणवीर सिंहच्या माघारीने निर्माण झालेल्या वादावर FWICE ने 'असहकार निर्देश' जारी केला आहे. ही बंदी नसून, सदस्यांना रणवीरसोबत काम न करण्याचे आवाहन आहे, असे अशोक पंडित यांनी स्पष्ट केले. निर्मात्यांचे मोठे नुकसान टाळण्यासाठी हा चुकीचा पायंडा थांबवणे हा यामागचा उद्देश आहे. दोघांमध्ये संवाद साधून प्रकरण मिटण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

‘डॉन 3’ चित्रपटातून ऐन वेळेस माघार घेतल्यानंतर अभिनेता रणवीर सिंह चर्चेच्या केंद्रस्थान आला. याप्रकरणी रणवीरला FWICE कडून नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्हचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली. खरंतर त दिग्दर्शक फरहान अख्तरने असा दावा केला होता की, ‘डॉन 3’ चित्रपटासाठी रणवीर निश्चित झाला होता, या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनवर आधीच 45 कोटी रुपये खर्च झाले होते. मात्र रणवीर अचानक चित्रपटातून बाहेर पडला. त्यामुळे फरहानने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) कडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी त्याची बाजू मांडण्यासाठी रणवीरला तीन वेळा बोलावण्यात आलं होतं, पण तो हजरच झाला नाही, असं FWICE ने प्रेस क़न्फरन्सदरम्यान सांगितलं. यानंतरच FWICE ने दिग्दर्शक, कॅमेरामन आणि क्रू सदस्यांना रणवीरसोबत काम न करण्याचे आदेश दिले. यामुळेच रणवीरवर बंदी घालण्यात आल्याची अफवा पसरली होती.
मात्र आता सर्व अफवांचं खंडन करण्यात आलं असून FWICE मुख्य सल्लागार आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. रणवीर सिंगसाठी या निर्देशाचा अर्थ काय आणि संस्थेने हे पाऊल का उचलले, हेही पंडित यांनी स्पष्ट केलं. अभिनेता रणवीर सिंह याच्यावर अधिकृतपणे बंदी घालण्यात आलेली नाही, परंतु जोपर्यंत या प्रकरणाचा गुंता सोडवला जात नाही तोपर्यंत रणवीरसोहत काम न करण्याच्या सूचना FWICEच्या सदस्यांना देण्यात आल्या आहेत, असा दावा अशोक पंडित यांनी केला
बंदी नव्हे , आम्ही नॉन-कोऑपरेशन जारी केलंय – अशोक पंडित
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अशोक पंडित म्हणाले की, कोणत्याही अभिनेत्यावर कायदेशीर बंदी घालण्याचा अधिकार संस्थेला नाही. मात्र FWICEने चित्रपट उद्योगातील विविध क्षेत्रांतील कामगारांसाठी नॉन-कोऑपरेशन (असहकार )निर्देश जारी केले आहेत. ” हे बघा, पहिले तर हे सगळं संभाषण चुकीच्या दिशेने जात आहे. (रणवीरवर) ही बंदी नाही. आम्ही काही न्यायालय नाही, आम्ही कोणावरही बंदी घालू शकत नाही. आम्ही असहकाराचा आदेश जारी केला आहे. नॉन-कोऑपरेशन, अर्थात असहकार, याचा अर्थ असा की आमचे सर्व 30 कारागीर सदस्य त्यांच्यासोबत (रणवीर) काम करणार नाहीत. मी त्याच्यासोबत काम करायचे की नाही, हा माझा निर्णय आहे.” असं पंडित यांनी स्पष्ट केलं.
रणवीरवर चुकीचा ट्रेंड सुरू करण्याचा आरोप
पुढे अशोक पंडित असंही म्हणाले की, अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष केल्यास इंडस्ट्रीमध्ये एक नकारात्मक पायंडा पडू शकतो, असे FWICEला वाटतं. ते म्हणाले, “एक कामगार संघटना म्हणून आम्ही आमच्या सदस्यांना अशा सूचना दिल्यात की, जोपर्यंत हे प्रकरण सॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत, तो(रणवीर सिंग) जिथे कुठे असेल, तुम्ही त्याच्यासोबत काम करू नका. कारण हा अतिशय चुकीचा ट्रेंड सेट होतोय. जर दिग्दर्शक किंवा अभिनेत्याने शेवटच्या क्षणी प्रोजेक्ट सोडला, तर निर्माते उद्ध्वस्त होतील. हे खूप मोठे नुकसान असेल, आणि कोट्यवधींचे नुकसान सहन करू शकणारी एक्सेल एंटरटेनमेंटसारखी कंपनी प्रत्येकाकडे नसते. अशावेळी लोक आत्महत्या करतील” असं अशोक पंडित यांनी सांगितलं.
रणवीर-फरहान यांच्यात सलोखा होण्याची आशा
या प्रकरणी तणाव असला तरीही हा प्रश्न संवादातूनच सोडवला जावा असं FWICEला वाटतं, असं अशोक पंडित यांनी नमूद केलं. पत्रकार परिषदेपूर्वी संस्थेने रणवीर सिंगशी अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं. “आम्ही किमान एकत्र बसून चर्चा करण्याचा आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, आशा आहे की तसं होईल. मला विश्वास आहे… आम्हाला अजूनही आशा आहे की हाँ प्रश्न सुटू शकतो, पण त्यासाठी एक बैठक आवश्यक आहे” असं अशोक पंडित म्हणाले.