AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’च्या यशानंतर रणवीर गँगस्टर्सच्या निशाण्यावर; धमकीबाबत मोठी माहिती उघड

'धुरंधर' या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेला अभिनेता रणवीर सिंहला काही दिवसांपूर्वी धमकी देण्यात आली होती. रणवीरच्या मॅनेजरकडे धमकीचा व्हॉइस नोट पाठवून दहा कोटी रुपयांची मागणी करण्यात आली.

'धुरंधर'च्या यशानंतर रणवीर गँगस्टर्सच्या निशाण्यावर; धमकीबाबत मोठी माहिती उघड
Ranveer SinghImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 20, 2026 | 9:38 AM
Share

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी: प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहला धमकीचा व्हॉइस नोट मिळाल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. रणवीरला बिष्णोई गँगकडून दहा कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. रणवीरच्या मॅनेजरला अमेरिकन मोबाइल नंबरवरून धमकीचा व्हॉइस नोट पाठवण्यात आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार, या क्रमांकाची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी मुंबई क्राइम ब्रांचने ठरलेल्या प्रोटोकॉलनुसार अमेरिकेतील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला आहे. या तपासात असंही समोर आलं आहे की, बिष्णोई गँगचा जवळचा साथीदार हॅरी बॉक्सर याने व्हॉइस नोट पाठवून रणवीर सिंहला धमकी दिली आणि दहा कोटी रुपयांची मागणी केली. रणवीरच्या मॅनेजरच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या व्हॉइस नोटमधील आवाज हॅरी बॉक्सरचाच असल्याची पुष्टी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मात्र, यासंदर्भातील इतर ठोस पुरावे गोळा करण्याचं काम क्राइम ब्रांचकडून सुरू आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतरच हा धमकीचा व्हॉइस नोट पाठवण्यात आला होता. या धमकीनंतर रणवीर सिंहची सुरक्षा वाढवण्यात आली असून क्राइम ब्रांचने त्याच्या मॅनेजरचा जबाब नोंदवला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींना धमक्या मिळाल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. आधी निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या इमारतीबाहेर गोळीबार झाला, त्यानंतर अभिनेता रणवीर सिंहला ऑडिओ मेसेजद्वारे धमकी देण्यात आली. काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्री हिमांशी खुरानाला खंडणीची मागणी करत धमकी देण्यात आली. हिमांशीकडेही 10 कोटी रुपये खंडणीची मागणी करण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांत बॉलिवूड सेलिब्रिटींना गँगस्टरकडून टारगेट करण्याचं प्रमाण वाढलं आहे. बिष्णोई गँगकडून आधी सातत्याने अभिनेता सलमान खानला धमक्या दिल्या जात होत्या. त्याच्याही वांद्रे इथल्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. आता बॉलिवूड इंडस्ट्रीतील इतर सेलिब्रिटींवरही निशाणा साधला जातोय. दरम्यान रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. गोळीबाराचा हा कट तुरुंगातून रचला गेल्याचा पोलिसांना संशय आहे. फरार आरोपी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरने तुरुंगातून हा सगळा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. प्रवीण लोणकर सध्या बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असून पोलिसांच्या मते त्याने तुरुंगात राहूनच शस्त्रे आणि पैशांची व्यवस्था केली अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद