रश्मिका-विजयच्या विवाह सोहळ्याने अवघ्या 18 तासांमध्ये रचला नवीन इतिहास, नेमकं काय घडलं?

रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानंतर विरोशने बनवला नवीन रेकॉर्ड, कियारा आणि आलियाला मागे टाकत रचला इतिहास. नेमकं काय घडलं?

रश्मिका-विजयच्या विवाह सोहळ्याने अवघ्या 18 तासांमध्ये रचला नवीन इतिहास, नेमकं काय घडलं?
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 27, 2026 | 7:02 PM

Rashmika mandanna vijay deverakonda Wedding Photos Records: 26 फेब्रुवारी 2026 रोजी राजस्थानमधील उदयपूर येथे रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी आपल्या दीर्घकाळाच्या नात्यानंतर लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. चाहत्यांना अधिकृत घोषणेची उत्सुकता होती आणि अखेर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ उडाला आहे.

लग्नसोहळ्याचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट होताच काही तासांतच त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. इतक्या वेगाने आणि प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला की या पोस्टने थेट नवा विक्रम प्रस्थापित केला. रश्मिका आणि विजय यांच्या लग्नाच्या फोटोला अवघ्या 18 तासांत तब्बल 1.8 कोटी लाइक्स मिळाले. त्यामुळे ही पोस्ट सर्वाधिक लाइक्स मिळवणारा सेलिब्रिटी वेडिंग पोस्ट ठरली आहे.

यापूर्वी हा विक्रम कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाच्या पोस्टच्या नावावर होता. त्यांच्या पोस्टला सुमारे 15.8 मिलियन लाइक्स मिळाले होते. तसेच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या फोटोचाही हा विक्रम मागे टाकण्यात आला आहे.

सोशल मीडियावर ‘विरोश’ (विजय देवरकोंडा- रश्मिका मंदाना) या नावाने ओळखली जाणारी ही जोडी सध्या ट्रेंडमध्ये आहे. त्यांच्या पारंपरिक वेशभूषेतील लूकने आणि साध्या, देखण्या पोझने चाहत्यांची मने जिंकली आहेत. एका खास फोटोमध्ये विजय रश्मिकाचा हात हातात घेताना दिसतो. या फोटोने भारतीय परंपरेची झलक आणि प्रेमाची सादगी दोन्ही सुंदरपणे दाखवली आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी या क्षणाची तुलना ‘शिव-पार्वतीसारख्या प्रेमाशी’ करत कौतुकाचा वर्षाव केला.

4 मार्च रोजी हैदराबाद येथे भव्य वेडिंग रिसेप्शन

रश्मिका आणि विजय यांच्या लग्नाने केवळ चाहत्यांचे स्वप्न पूर्ण केले नाही तर सोशल मीडियावरही इतिहास रचला आहे. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्याने आणि इंस्टाग्रामवरील विक्रमाने संपूर्ण मनोरंजनविश्वात चर्चेचा विषय निर्माण केला आहे.

उदयपूरमधील विवाहसोहळ्यानंतर 4 मार्च रोजी हैदराबाद येथे भव्य वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या समारंभाला मनोरंजनसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या रिसेप्शनकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us