AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मार्च महिन्यात किती दिवस बँका बंद?, इतके दिवस शेअरबाजारही बंद, पाहा सुट्ट्यांची लिस्ट

मार्च महिन्यात तुमचे बँक किंवा शेअर बाजाराशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर आत्ताच त्याचे नियोजन करावे लागणार आहे.कारण मार्चमध्ये होळी, ईद आणि रामनवमी यासारख्या मोठ्या सणांमुळे बँका आणि शेअर बाजारांना सुट्टी असणार आहे.

मार्च महिन्यात किती दिवस बँका बंद?, इतके दिवस शेअरबाजारही बंद, पाहा सुट्ट्यांची लिस्ट
bank holiday
| Updated on: Feb 27, 2026 | 10:12 PM
Share

फेब्रुवारीचा महिना जवळपास संपला असून आता मार्च 2026 ची सुरुवात होत आहे. अशात मार्चमध्ये बँकेशी संबंधीत कामे असतील आणि तुम्ही ती करण्याचा विचार करत आहात तर बँकांच्या सुट्ट्यांची यादी आधी जरुर तपासा. अनेकदा तुम्ही बँकेच्या शाखेत जाता त्यानंतर कळते की बँक बंद आहे, त्यामुळे बँकेतील कामे असतील तर ही यादी तुमच्या कामी येऊ शकते.

आरबीआयच्या अधिकृत सुट्ट्याच्या यादीनुसार मार्च २०२६ मध्ये वेग-वेग राज्यात एकूण १८ दिवस बँका बंद रहाणार आहेत. यात साप्ताहिक सुट्ट्या, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्या याशिवाय विविध राज्यातील सणांच्या सुट्ट्यांचा देखील समावेश आहे.

मार्चमध्ये बँक केव्हा असणार बंद?

1 मार्च: रविवार (साप्ताहिक सुट्टी, संपूर्ण देशात )

2 मार्च: होलिका दहन (काही जागी उदा. उत्तर प्रदेशात )

3-4 मार्च: होळी/धुळवड (अनेक राज्यात 3 किंवा 4 मार्च रोजी सुट्टी,उदा. दिल्ली, मुंबई, UP, महाराष्ट्र आदी बंद)

8 मार्च: रविवार (साप्ताहिक सुट्टी, संपूर्ण देशात )

13 मार्च: चापचर कुट (मिझोरम )

14 मार्च: दूसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी, संपूर्ण देशात )

15 मार्च: रविवार (साप्ताहिक सुट्टी, संपूर्ण देशात )

17 मार्च: शब-ए-कद्र (जम्मू-कश्मीरात )

19 मार्च: गुढी पाडवा/उगादी/नवरात्री सुरुवात (महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाना आदी अनेक राज्यात )

20-21 मार्च: ईद-उल-फितर (रमजान ईद, संपूर्ण देशात वा अनेक राज्यात )

22 मार्च: रविवार (साप्ताहिक सुट्टी, संपूर्ण देशात )

26 मार्च: राम नवमी (अनेक राज्यांत )

27 मार्च: राम नवमीनंतर (काही राज्यांत )

28 मार्च: चौथा शनिवार (साप्ताहिक सुट्टी, संपूर्ण देशात )

29 मार्च: रविवार (साप्ताहिक सुट्टी, संपूर्ण देशात )

31 मार्च: महावीर जयंती

ऑनलाईन करु शकता बँकेची अनेक कामे

बँकेच्या शाखा जरी बंद असल्या तरी ग्राहकांना घाबरण्याची काही गरज नाही. नेट बँकींग, मोबाईल बँकींग आणि एटीएम सर्व्हीसेस सामान्य रुपाने चालू रहातील. या माध्यमातून तुम्ही पैशांचे देवाण-घेवाणीचे व्यवहार, फंड ट्रान्सफर आणि अन्य डिजिटल सेवांचा वापर करु शकता.

शेअर बाजारात 12 दिवस कामकाज बंद

मार्च महिन्यात बँकांच्या सुट्ट्यासह भारतीय शेअर बाजार देखील एकूण 12 दिवस बंद राहणार आहे. 3 मार्च ( होळी ), 26 मार्च ( श्री राम नवमी ) आणि 31 मार्च ( श्री महावीर जयंती ) रोजी शेअर बाजारात कामकाज होणार नाही. याशिवाय शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्ट्यांमुळे देखील 9 दिवस ट्रेडिंग बंद राहणार आहे. असे एकूण 12 दिवस कामकाज बंद राहणार आहे.

बँक ब्रँच जाण्याआधी पाहा हॉलिडे लिस्ट

त्यामुळे मार्च महिन्यात बँकेशी किंवा शेअर बाजाराशील संबंधित काही कामकाज असेल तर योजना बनवण्याआधी सुट्ट्याची यादी अवश्य पाहून जाण्याचा विचार करावा म्हणजे तुमचा निष्कारण हेलपाटा होणार नाही.

Follow Us
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क...
अशोक खरात प्रकरणातून सुटण्यासाठी बडे नेत चक्क....
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह...
मोठी बातमी! निदा खानला आसरा देणाऱ्या मतीनच्या घरावर बुलडोझर? घरासह....
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं
चाकणकरांनी माझ्यावर दबाव टाकला... अशोक खरातचा भांडाफोड करणाऱ्याने सगळं.
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 2 तासांपासून चौकशी सुरु, शिवनिका.
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च
शिंदेंचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर, 175 कोटी खर्च.
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात
मुख्यमंत्री होताच विजय यांचा मास्टरस्ट्रोक; काही तासांतच घेतला सर्वात.
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह
रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष कशा झाल्या? दमानियांनी मांडले मह.
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र
मोठी बातमी! SIT चौकशीला सामोर जाण्याआधी चाकणकर थेट दिवंगत नेते रवींद्र.
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.