
मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. यंदा निवडणुकीत बॉलिवूडचा जोरदार प्रभाव दिसून आला. अभिनेत्री रवीना टंडनने शिवसेना ठाकरे गटासाठी प्रचार केला. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे रवीनाने जोरदार प्रचार केला असला तरी प्रत्यक्षात मतदानाला ती अनुपस्थित होती. सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ती वांद्र पश्चिमेतील 101 वॉर्डमधील शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार अक्षता मेनेझेस यांच्या समर्थनार्थ घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसली. इतकंच नव्हे तर रवीनाने रविवारी चिंबई ते कांठवाडीपर्यंतच्या रोड शो आणि पदयात्रेत उत्साहाने सहभाग घेतला होता.
कुर्ता परिधान करून आणि गळ्यात मशालीचं चिन्ह असलेला लाल स्कार्फ घालून ती प्रचार करत होती. यावेळी तिने नागरिकांशीही संवाद साधला होता. प्रचारातील तिच्या या सक्रिय सहभागामुळे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्तेसुद्धा उत्साहित झाले होते. इतक्या प्रचारानंतर रवीना गुरुवारी मतदान केंद्रावर येणाऱ्यांपैकी पहिली नागरिक असेल अशी अपेक्षा होती. परंतु मुंबईत महानगरपालिकेसाठी मतदान सुरू असताना रवीना टंडन तिचा मतदानाचा हक्क न बजावताच परदेशात रवाना झाली.
Maharashtra Election Results 2026 : 17 पैकी 16व्या प्रभागात तीनही जागा काँग्रेसला
Maharashtra Election Results 2026 : पराभवानंतर अजित पवारांची पहिली मोठी प्रक्रिया..
मुंबईच्या प्रभाग क्रमांक 190 मधून भाजपच्या शीतल गंभीर विजयी
मुंबई मालाड पश्चिम प्रभाग क्रमांक 49 मधून काँग्रेसच्या उमेदवार संगीता कोळी विजयी
सांगली महापालिकेतील फायन आकडा घ्या जाणून
सातारकरांनी अनुभवली खासदार उदयनराजे आणि शंभूराज देसाई यांची मैत्री
राज्यातील 29 महापालिकांसाठी गुरुवारी मतदान झालं. या मतदानाला फक्त रवीना टंडनच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी अनुपस्थित होते. रवीनाने तर महापालिकेसाठी उघड प्रचार केला होता. तरीसुद्धा तिने मतदान का केलं नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. ‘टीव्ही 9 हिंदी डिजिटल’शी बोलताना रवीनाच्या जवळच्या एका सूत्राने दावा केला की मतदानाला तिच्या अनुपस्थितीमागे एक महत्त्वाचं कारण आहे. कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे रवीनाला अचानक परदेशी जावं लागलं, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबई महानगरपालिकेच्या मतदानाला शाहरुख खान, दीपिका पादुकोण, अजय देवगण, काजोल, कतरिना कैफ, प्रियांका चोप्रा, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, गोविंदा, रणवीर सिंग यांसारखे अनेक सेलिब्रिटी अनुपस्थित होते. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीत आतापर्यंत समोर आलेल्या कलामध्ये भाजप आघाडीवर आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसाठी युती केली. पण त्याचा काही उपयोग झाला नसल्याचं कलांमधून दिसून येत आहे.