Raveena Tandon | चित्रपटांमधील रेप सीन, किसिंग सीनबद्दल रवीना टंडनचा मोठा खुलासा; म्हणाली “माझे कपडे..”

| Updated on: Feb 07, 2023 | 12:39 PM

चित्रपटसृष्टीत स्वत:च्या अटीशर्तींवर काम करताना रवीनाला अनेक टोमण्यांचा सामना करावा लागला. याविषयीही तिने खुलासा केला. रवीनाने 1991 मध्ये 'पत्थर के फूल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने सलमान खानसोबत भूमिका साकारली होती.

Raveena Tandon | चित्रपटांमधील रेप सीन, किसिंग सीनबद्दल रवीना टंडनचा मोठा खुलासा; म्हणाली माझे कपडे..
Raveena Tandon
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई: अभिनेत्री रवीना टंडन नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडमधील रेप सीन आणि किसिंग सीनबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. चित्रपटसृष्टीत स्वत:च्या अटीशर्तींवर काम करताना रवीनाला अनेक टोमण्यांचा सामना करावा लागला. याविषयीही तिने खुलासा केला. रवीनाने 1991 मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने सलमान खानसोबत भूमिका साकारली होती. मोठ्या पडद्यावर एखादं बोल्ड दृश्य देताना जराही संकोचलेपणा वाटत असेल तर रवीना त्यास थेट नकार देत असे. मात्र यामुळे तिला इतर लोक उद्धट म्हणू लागले होते.

एएनआयला दिलेल्या या मुलाखतीत रवीना म्हणाली, “मी बऱ्याच गोष्टींबद्दल अनकम्फर्टेबल होते. उदाहरणार्थ, डान्स स्टेप्स. जर मला एखादी गोष्टी अनकम्फर्टेबल वाटली तर मी थेट त्यांना सांगायचे की मी ती स्टेप करणार नाही. मला स्विमिंग कॉस्च्युम्स घालायचे नव्हते आणि किसिंग सीन्सही करायचे नव्हते. मी अशी एकमेव अभिनेत्री असेन जिने मोठ्या पडद्यावर बलात्काराचे सीन्स करताना किंचितही ड्रेस कुठे फाटलेला दाखवलेला नसेल. माझे सर्व कपडे जसेच्या तसे असायचे. माझा ड्रेस फाटणार नाही, तुम्हाला सीन करायचा असेल तर करा, असं मी थेट म्हणायची. यामुळे ते मला उद्धट म्हणायचे.”

हे सुद्धा वाचा

90 च्या दशकात स्वत:च्या अटीशर्तींवर चित्रपटात काम करताना रवीनाला काही चित्रपट गमवावे लागले होते. याविषयी तिने पुढे सांगितलं, “डर या चित्रपटाची ऑफर सर्वांत आधी मलाच मिळाली होती. त्यातील सीन्स अश्लील नव्हते, मात्र सुरुवातील त्यात असे काही सीन्स होते, जे करण्यासाठी मी कम्फर्टेबल नव्हती. मी कधीच स्विमिंग कॉस्च्युम घालायचे नाही. मी स्पष्ट नकार द्यायचे. प्रेम कैदी हा चित्रपटसुद्धा आधी माझ्याकडे आला होता. पण त्यातसुद्धा एक सीन असा होता जेव्हा हिरो चेन खेचल्यानंतर स्ट्रॅप दिसून येते. ते दृश्य शूट करण्यासाठी माझा नकार होता. त्याच चित्रपटातून करिश्मा कपूरला लाँच करण्यात आलं होतं.”

रवीना ‘केजीएफ: चाप्टर 2’मध्ये झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. ती लवकरच संजय दत्तसोबत ‘घुडचडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती अरबाज खान प्रॉडक्शन अंतर्गत ‘पटना शुक्ला’ या चित्रपटातही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.