ट्विंकल खन्नाशी तुलना होताच भडकली रवीना टंडन; म्हणाली ‘मोतीबिंदूचं ऑपरेशन..’

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 1:03 PM

रवीना सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर 'आस्क मी एनिथिंग' या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला.

ट्विंकल खन्नाशी तुलना होताच भडकली रवीना टंडन; म्हणाली 'मोतीबिंदूचं ऑपरेशन..'
Raveena Tandon and Twinkle Khanna
Image Credit source: Instagram

मुंबई: अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि रवीना टंडन या दोघी 90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री आहेत. अनेकदा या दोघींच्या लूकमध्ये नेटकऱ्यांना साम्य जाणवतं. रवीना आणि ट्विंकलचा चेहरा बऱ्याच अंशी एकसारखा दिसत असल्याचं अनेकजण म्हणतात. यामुळे अनेकदा सोशल मीडियावर रवीनाला ट्विंकल म्हटलं गेलंय तर ट्विंकलला रवीना म्हटलं गेलंय. मात्र ही तुलना अभिनेत्री रवीनाला काही आवडली नाही, असं दिसतंय. नुकत्याच एका चाहत्याने तिची तुलना ट्विंकलच्या दिसण्याशी केली. त्यावरून रवीनाने असा रिप्लाय दिला, ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

रवीना सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती तिचे बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिच्या चाहत्यांनी तिला विविध प्रश्न विचारले आणि रवीनानेही त्याची उत्तरं मोकळेपणे दिली.

‘आस्क मी एनिथिंग’ सेशनदरम्यान एका चाहत्याने रवीनाची तुलना ट्विंकल खन्नाशी केली. ‘लहानपणापासून मी रवीना आणि ट्विंकल खन्नाचा चेहरा ओळखताना नेहमीच गोंधळतो. या दोघींच्या दिसण्यात फरक शोधणं खूप अवघड आहे’, असं एका युजरने लिहिलं. त्यावर कमेंट करताना रवीनाने मस्करीत लिहिलं, ‘तुम्ही मोतीबिंदूचं ऑपरेशन करून घ्या, फंडची सोय केली जाईल.’

याआधीही रवीना आणि ट्विंकलच्या दिसण्यावरून काही मजेशीर घटना घडल्या आहेत. अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या वेळी ट्विंकल खन्नाने अरुणाचलम मुरुगनाथम यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचा उल्लेख केला होता. एका मुलाखतीत ती म्हणाली, “जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा अरुणाचलम यांनी मला म्हटलं की मी रवीना टंडनसारखी दिसते. हे ऐकून मला त्यांची कथा सोडण्याचाही विचार मनात आला होता.”

दुसऱ्या एका मुलाखतीत जेव्हा काही पत्रकारांनी रवीनाला ट्विंकलच्या या कमेंटवर प्रतिक्रिया देण्यास विचारलं. तेव्हा रवीना म्हणाली, “तिने खरंच असं म्हटलं होतं का? मला तिची कमेंट पहावी लागेल.” नंतर रवीनाने असंही स्पष्ट केलं की ट्विंकल तिची खूप चांगली मैत्रीण आहे आणि त्या दोघी अनेकदा एकमेकींची भेट घेतात.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI