
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा या कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. पण जास्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातीस बरेच प्रसंग, किस्से आजही चर्चेचा विषय ठरतात. असाच एक प्रसंग एका अभिनेत्यानेही सांगितला आहे. रेखासोबत काम करतानाचा त्याचा अनुभवही सांगितला आहे. तसेच रेखा त्यांच्या आयुष्यात ज्या एका गोष्टीला घाबरतात त्याबद्दलही या अभिनेत्याने सांगितलं आहे.
हा अभिनेता म्हणजे कबीर बेदी. कबीर बेदी यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्यांनी 1988 मध्ये आलेल्या खून भारी मांग या चित्रपटात रेखासोबत काम केले होते. या चित्रपटात त्यांनी नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका साकारल्या होत्या. आता कबीर यांनी रेखासोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव सांगितला.
चित्रपटात नायक देखील खलनायक आहे
एका मुलाखतीत कबीर म्हणाले, ‘मला खून भरी मांग हा चित्रपट सर्वात जास्त आठवतो. तो चित्रपट सुपरहिट झाला होता. मी दुसऱ्या एका मालिकेत काम करत होतो. त्या काळात मला राकेश रोशनचा फोन आला. त्यांनी मला चित्रपटाच्या नायकाची भूमिका ऑफर केली आणि मी त्यांना विचारले की तुम्ही मला का निवडले. यानंतर त्यांनी मला सांगितले की या चित्रपटात नायक देखील खलनायक आहे आणि इतर कोणताही नायक ही भूमिका करू इच्छित नाही. त्यांनी सांगितले की फक्त मीच नायक आणि खलनायकाची भूमिका करू शकतो.’
रेखासोबत काम करून आनंद झाला
कबीर पुढे म्हणाले की, “रेखासोबत काम करायला मिळणे मला भाग्यवान वाटते. राकेशने मला रेखा या चित्रपटात नायिका असल्याचे सांगताच मी होकार दिला. त्यावेळी तिच्यासोबत काम करणे अभिमानाची गोष्ट होती. उमराव जानसाठी तिने अनेक पुरस्कार जिंकले होते आणि ती एक उत्तम अभिनेत्री होती, म्हणून मी माझे दुसरे शूट पुन्हा शेड्यूल केले. रेखाने तो चित्रपट आजचा आहे तसा बनवला, ती खून भरी मांग चित्रपटाची हृदय आणि आत्मा होती. या चित्रपटाने लोकांची मने जिंकली आणि मला ही मोठी संधी सोडायची नव्हती.’
रेखासोबत फक्त चित्रपटांपुरताचं बोलणं व्हायचं
तथापि, कबीर यांनी असेही सांगितले की ते रेखासोबत फारसे मोकळेपणाने बोलू शकत नव्हते कारण रेखा खूप संवेदनशील आहे आणि त्यांना दुखावले जाऊ अशी सतत भीती वाटत राहायची.
रेखा यांना याच गोष्टीची भीती जाणवते
कबीर यांनी म्हटलं की, “आम्ही दोघेही एकमेकांचा आदर करतो. ती खूप खाजगी व्यक्ती आहे. ती खूप संवेदनशील मुलगी होती जिला दुखावले जाण्याची सतत भीती वाटत होती, म्हणून ती स्वतःचे रक्षण करायची आणि तिच्या या भावनेचा मी आदर करायचो. आजही आम्ही चांगले भेटतो. पण असे कधीच घडले नाही की आम्ही एकत्र बसून बोललो. कामानंतर आम्ही बोललो नाही. मला वाटतं ती याच गोष्टीला सर्वात जास्त घाबरते”