
आज आपण अशा बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जी हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठे नाव होती. 70 ते 90 च्या दशकात तिने चित्रपटसृष्टीत खूप नाव कमावले. उत्कृष्ट अभिनयाबरोबरच ती नृत्यातही अप्रतिम होती. तिच्या सौंदर्यानेही ती नेहमी चर्चेत राहिली. आपण बोलत आहोत अभिनेत्री रेखाबद्दल.
रेखाची वेगळी अशी ओळख सांगण्याची गरज नाही. बॉलिवूडमध्ये तिने अनेक वर्षे काम केले आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर राज्य केले. जरी ती आता बराच काळ मोठ्या पडद्यापासून दूर असली, तरी रेखा असे व्यक्तिमत्त्व आहे जे विसरता येणार नाही. तिने आपल्या वैयक्तिक आयुष्यानेही नेहमी सर्वांचे लक्ष वेधले होते. तिची अनेक प्रेमप्रकरणे झाली. लग्नही केले. मात्र, तिचे लग्न यशस्वी झाले नाही. आज आम्ही तुम्हाला रेखाच्या लग्नाशी संबंधित एक रंजक किस्सा सांगणार आहोत. तिने झोपलेल्या पंडिताला उठवून मंदिरात लग्न केले होते.
Video: निळ्या रंगाचा नाग? शेतकऱ्याने काढी मारली तेवढ्यात… व्हिडीओ पाहून उडेल थरकाप
मुकेश अग्रवाल यांच्याशी केले लग्न
रेखाचे नाव कधीकाळी हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याशी जोडले गेले होते. नंतर दोघे वेगळे झाले. असे म्हटले जाते की तिने दिवंगत अभिनेता विनोद मेहरा यांच्याशी लग्न केले होते. पण हे नातेही टिकले नाही. त्यानंतर रेखाने 1990 मध्ये दिवंगत उद्योजक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केले.
रात्री साडेदहा वाजता झाले लग्न
पत्रकार आणि लेखक यासिर उस्मान यांनी लिहिलेल्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात रेखाच्या आयुष्यातील अनेक रंजक किस्से आहेत. यात तिच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख आहे आणि मुकेश अग्रवाल यांच्याशी झालेल्या लग्नाचा किस्सा देखील आहे. या पुस्तकानुसार, 4 मार्च 1990 रोजी रेखाने मुकेश यांच्याशी लग्न केले.
दोघेही लग्नासाठी मुंबईतील मुक्तेश्वर मंदिरात गेले होते. पण तेव्हा खूप रात्र झाली होती. असे म्हटले जाते की, तेव्हा मंदिराचे पुजारी संजय बोडस झोपले होते. पण मुकेश यांनी पंडितांना उठवले आणि सांगितले की ते लग्नासाठी आले आहेत. रेखाला पाहून पुजारी थक्क झाले. रेखा त्या मंदिरात नेहमी येत असली, तरी इतक्या रात्री लग्नासाठी तिला तिथे पाहून पुजारी अवाक झाले. त्यानंतर त्यांनी रेखा आणि मुकेश यांचे लग्न लावले, जे रात्री साडेदहा वाजता झाले. पण लग्नानंतर काही महिन्यांतच 1990 मध्ये मुकेश यांनी आत्महत्या केली.