Video: निळ्या रंगाचा नाग? शेतकऱ्याने काढी मारली तेवढ्यात… व्हिडीओ पाहून उडेल थरकाप
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये निळ्या रंगाचा नाग शेतात फिरताना दिसत आहे.

सापाचे नाव जरी काढले भल्याभल्या लोकांना घाम फुटतो. मग तो विषारी असो वा बिनविषारी असतो. नुकताच एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये शेतात निळ्या रंगाचा नाग आढळल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले असून, शेतकऱ्यांना आणि शेतात काम करणाऱ्या मजुरांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
काय आहे व्हिडीओ?
या व्हिडिओत दिसणारा निळा साप हा सामान्य सापापेक्षा वेगळा दिसतो आहे. त्याचा रंग आणि आकार यामुळे तो लक्ष वेधून घेत आहे. शेतात काम करताना अशा सापांपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे, कारण नाग साप हा विषारी असतो आणि त्याचा दंश जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत काळजी घेण्यास सांगितले आहे.
वाचा: या वासाला सापही चळाचळा कापतात, वास येताच पळतात 100 किलोमीटर दूर; पावसाळ्यात तर…
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट?
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, शेतात काम करताना बूट किंवा पायघोळ घालावेत, तसेच उंच गवत किंवा दाट झुडपांमध्ये हात घालण्यापूर्वी काठीने तपासणी करावी. सापांपासून बचावासाठी सावधगिरी बाळगणे आणि स्थानिक वन्यजीव तज्ज्ञांशी संपर्क साधणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. काहींनी हा साप खरोखरच निळ्या रंगाचा आहे की व्हिडिओत काही बदल करण्यात आले आहेत, याबाबत शंका उपस्थित केली आहे. तसेच काहींनी यामुळे शेतकऱ्यांमध्ये सावधगिरी बाळगण्याची नक्कीच गरज आहे असे म्हटले. शेतकऱ्यांनी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांनी सापांपासून सावध राहावे आणि कोणताही संशयास्पद साप दिसल्यास तात्काळ स्थानिक प्रशासन किंवा सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असा सल्ला दिला जात आहे.
