AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॉपलेस फोटोशूटमुळे ठरली ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’, ड्रग्जच्या केसनं संपवलं करिअर; अभिनेत्री आता बनली साध्वी

1993 मध्ये तिने स्टारडस्ट या मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या बोल्ड फोटोशूटमुळे ती 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' म्हणून ओळखली जाऊ लागली. यानंतर तिला 15 हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यावेळी या मासिकाच्या प्रती ‘काळा बाजार’ करून विकल्या गेल्या. 

टॉपलेस फोटोशूटमुळे ठरली 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन', ड्रग्जच्या केसनं संपवलं करिअर; अभिनेत्री आता बनली साध्वी
बॉलिवूडची 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' आता बनली साध्वीImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 11, 2023 | 12:09 PM
Share

मुंबई : अभिनेत्री दिव्या भारतीच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीत एक पोकळी निर्माण झाली होती. त्यावेळी बऱ्याच अभिनेत्रींनी ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला. सौंदर्याचा विचार केला तर दिव्याशी बरोबरी करणाऱ्या अभिनेत्री इंडस्ट्रीत फार कमी होत्या. त्यातही नंतर अभिनेत्री ममता कुलकर्णी बॉलिवूडमध्ये चर्चेत आली. मात्र चित्रपटांपेक्षा ममता तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत होती. ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर एका गुन्हेगारी प्रकरणामुळे अवघ्या काही वर्षांत तिचं करिअर संपुष्टात आलं होतं.

ममता कुलकर्णीने 1992 मध्ये ‘तिरंगा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. नंतर ‘आशिक आवारा’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली. क्रांतीवीर, करण अर्जुन आणि सबसे बडा खिलाडी यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांमुळे तिला लोकप्रियता मिळू लागली. 1993 मध्ये तिने स्टारडस्ट या मासिकासाठी टॉपलेस फोटोशूट करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या बोल्ड फोटोशूटमुळे ती ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ म्हणून ओळखली जाऊ लागली. यानंतर तिला 15 हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यावेळी या मासिकाच्या प्रती ‘काळा बाजार’ करून विकल्या गेल्या. इतकंच नव्हे तर या वादाच्या काही वर्षांनंतर ममताने पुन्हा एकदा बोल्ड फोटोशूट केलं होतं.

2013 मध्ये ममताने विकी गोस्वामीशी लग्न केलं. ड्रग्जच्या दुनियेत विकी गोस्वामी हे नाव खूप मोठं होतं. 2016 मध्ये 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटमध्ये सहआरोपी म्हणून तिचं नाव समोर आल होतं. या रॅकेटचा मास्टरमाइंड विकी होता. 2017 मध्ये पोलिसांनी तिच्या मुंबईतील घरी जाऊन तिला ‘गुन्हेगार’ घोषित केलं होतं. मात्र ममताने तिच्या विरोधातील सर्व आरोप फेटाळले होते.

2016 मध्ये ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामीला केनिया विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. पण नंतर त्यांना सोडण्यात आलं होतं. असं म्हटलं जातं की, तिला चित्रपटात काम मिळावं म्हणून अंडरवर्ल्डमधून फोन यायचे.

2010 च्या मध्यात ममताने ‘योगिनी’ बनल्याचं घोषित केलं होतं. तिने तिच्या आयुष्यावर आधारित आत्मचरित्रसुद्धा लिहिलं होतं. 2003 मध्ये तिने ‘शेष बोंगसोधर’ या बांगलादेशी चित्रपटात शेवटचं काम केलं होतं. तर 2002 मध्ये ‘कभी तुम कभी हम’ हा तिचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ठरला. आता गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ती चित्रपटसृष्टीत सक्रिय नाही.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?