Rhiya Ahir : हिंमतीनं पोलिसांची व्हॅन अडवली, पण एका भीतीमुळे 2 रात्र उडली रियाची झोप, अखेर वेदना समोर आल्याच
Rhiya Ahir : मुंबई येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलना दरम्यान पोलिसांच्या व्हॅन समोर उभी राहत मॉडेल रिया अहिर हिने व्हॅनमध्ये उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना सोडण्याची माहणी केली. तेव्हा रिया हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता यावर रिया हिने दिलेली प्रतिक्रिया समोर येत आहे.

Rhiya Ahir : दिल्ली येथील जंतरमंतर येथे सुरु झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आता देशव्यापी स्वरुप प्राप्त झालं आहे. अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यांवर उतरत आंदोलन करत आहेत. 22 जुलै रोजी मुंबईत देखील आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण एका तरुणीच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष केंद्रित केलं. आंदोलना दरम्यान 27 वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री रिया अहिर हिने असं काही केलं, ज्यामुळे सर्वत्र तिचं कौतुक झालं. मुंबई पाऊस सुरु असताना रिया पोलिसांच्या व्हॅनसमोर बिनधास्त उभी राहिली… त्यानंतर रिया हिने एका मुलाखतीत मनातील भावना देखील व्यक्त केल्या…
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत रिया अहिर म्हणाली, ‘त्या वेळेस मला कोणत्याच दुसऱ्या लोकांचा विचार मनात आला नाही. माझं लक्ष फक्त आणि फक्त पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसलेल्या लोकांकडे होतं. तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी माझ्यासोबत सम्मानजनक व्यवहार केला. मी देखील त्यांच्यासोबत आदराने बोलते होते…’, कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करण्याचा हेतू रिया हिचा मुळीच नव्हता…
रिया म्हणाली, ‘मी फक्त एक जबाबदार नागरिक म्हणून तेथे उभी होती. यामध्ये माझ्या आई – वडिलांनी मला पूर्ण पाठिंबा दिली. पण व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मला प्रचंड भीती वाटलेली… मी घाबरलेली होती… माझे फोटो, व्हिडीओ व्हायरल व्हावे… अशी माझी बिलकूल अपेक्षा नव्हती… पण तो इतका मोठा मुद्दा बनेल… असं मला वाटलं देखील नव्हतं…’, असं देखील रिया म्हणाली.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रिया दोन रात्र झोपू शकली नाही. रिया हिच्या म्हणण्यानुसार, आंदोलनात उपस्थित असलेले विद्यार्थी अद्यापही मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. हिच गोष्ट मला अधिक सतावत आहे… सरकारला आवाहन करत, रिया म्हणाली, ‘विद्यार्थ्यांवर जे FIR दाखल करण्यात आले आहेत, ते रद्द करण्यात यावे…’
रिया पुढे म्हणाली, ‘सरकारने आपल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. विद्यार्थी अजूनही संघर्षाचा सामना करत आहेत. जर तुम्ही विद्यार्थ्यां त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवायचा की नाही? अशा पेचात अडकवले, तर तुम्ही आम्हाला तुमच्या विरोधात जाण्यास भाग पाडत आहात. आम्ही तुमचे शत्रू नाही… तुम्ही आमचे मित्र बना…’, असं देखील रिया म्हणाली आहे.