Tiger 3 | प्रदर्शनाच्या आधीच तब्बल इतक्या कोटींना विकले गेले ‘टायगर 3’चे OTT हक्क

सलमान आणि कतरिनाच्या या चित्रपटाचा प्रदर्शनाच्या आधीच मोठा फायदा झाला आहे. एक था टायगर आणि टायगर 2 या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर उत्तर प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे तिसरा भागसुद्धा यशस्वी ठरेल असा अंदाज आहे. 

Tiger 3 | प्रदर्शनाच्या आधीच तब्बल इतक्या कोटींना विकले गेले 'टायगर 3'चे OTT हक्क
'पठाण'सह या चित्रपटांनीही विकले तब्बल इतक्या कोटींना हक्कImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 1:24 PM

मुंबई: सध्याच्या काळात एखादा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होताच प्रेक्षकांना त्याच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा असते. जे प्रेक्षक अजूनही थिएटरमध्ये जाण्याआधी चार वेळा विचार करतात किंवा ज्यांना पुरेसा वेळ मिळत नाही, त्यांच्यासाठी ओटीटी हा उत्तर पर्याय आहे. 25 जानेवारी रोजी शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘पठाण’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. सध्या बॉक्स ऑफिसवर पठाणचीच जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाने फक्त देशातच नाही तर परदेशातही दमदार कमाई केली आहे. मात्र आता चाहत्यांना ‘पठाण’च्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पठाणचे हक्क विकत घेण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मने भरभक्कम रक्कम मोजली आहे.

पठाण-

पठाण या चित्रपटातून शाहरुख खानने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेतून कमबॅक केलं आहे. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांसाठी हा जणू उत्सवच आहे. चित्रपटाला थिएटरमध्ये मिळालेला जबरदस्त प्रतिसाद पाहिल्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मनेही मोठी रक्कम देऊन पठाणचे हक्क विकत घेतले आहेत. ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने तब्बल 100 कोटी रुपये किंमतीला पठाणचे ओटीटी हक्क विकत घेतल्याचं कळतंय.

ब्रह्मास्त्र: पार्ट वन शिवा

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाला प्रदर्शित होऊन बराच काळ झाला. या चित्रपटानेही दमदार कमाई केली होती. डिस्ने प्लस हॉटस्टार या प्लॅटफॉर्मने 80 कोटी रुपये मोजून ब्रह्मास्त्रचे ओटीटी हक्क विकत घेतले आहेत.

हे सुद्धा वाचा

टायगर 3

सलमान खानच्या टायगर 3 या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अद्याप बराच वेळ आहे. मात्र प्रदर्शनाच्या आधीच या चित्रपटाने आपला दबदबा निर्माण केला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ॲमेझॉन प्राइम व्हिडीओने तब्बल 200 कोटी रुपयांना या चित्रपटाचे हक्क विकत घेतले आहेत. त्यामुळे सलमान आणि कतरिनाच्या या चित्रपटाचा प्रदर्शनाच्या आधीच मोठा फायदा झाला आहे. एक था टायगर आणि टायगर 2 या दोन्ही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर उत्तर प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे तिसरा भागसुद्धा यशस्वी ठरेल असा अंदाज आहे.

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.