ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा चॅप्टर 1’ ची जादू बॉक्स ऑफिसवर अजूनही; 20 व्या दिवशीही बक्कळ कलेक्शन
ऋषभ शेट्टी दिग्दर्शित 'कांतारा चॅप्टर 1' बॉक्स ऑफिसवर अजूनही धमाकेदार कमाई करत आहे. प्रदर्शनाच्या 20 व्या दिवशीही चित्रपटाची क्रेझ कायम असून, आतापर्यंत त्याने 547.15 कोटी रुपये जमा केले आहेत. लवकरच हा चित्रपट 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे, जो निर्मात्यांसाठी मोठा नफा ठरत आहे.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा “कांतारा चॅप्टर 1” बॉक्स ऑफिसवर धमाकूळ घालतोय. 2 ऑक्टोबर रोजी जगभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ कमी होताना दिसत नाहीये. चित्रपटातील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे लोक कौतुक करताना थकत नाहीयेत. यामुळेच 20 दिवसांनंतरही ‘कांतारा चॅप्टर 1’ बॉक्स ऑफिसवर आपले स्थान टिकवून आहे. एवढंच नाही तर हा चित्रपट रिलीज होऊन आज तब्बल 20 दिवस झाले असले तरी देखील चित्रपट बक्कळ कमाई करताना दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊयात की, 20 व्या दिवशी या चित्रपटाने किती कोटी कमावले आहेत.
चित्रपटाचे 20 व्या दिवशीचे कलेक्शन किती?
‘कांतारा चॅप्टर 1’ आता 600 कोटींच्या कमाईच्या जवळ आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने हाउसफूलचे शो दिले आहेत. तसेच पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाती बक्कळ कमाई राहिली आहे. 20 व्या दिवशीही या चित्रपटाने बरीच कमाई केली आहे. 20 दिवसांत चित्रपटाच्या नावावर 547.15 कोटी रुपये आपल्या खात्यात जमा केले आहेत. येत्या काही दिवसांत हा चित्रपट 600 कोटींच्या क्लबमध्ये सहज सामील होईल अशी निर्मात्यांना आशा आहे.
कलेक्शन अजूनही सुरूच आहे.
या चित्रपटाच्या कलेक्शनमुळे निर्मात्यांना मोठा नफा झाला आहे. निर्मात्यांनी चित्रपट बनवण्यासाठी फक्त 120 कोटी रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने त्याच्या बजेटपेक्षा चार पट जास्त कमाई केली आहे आणि हा कलेक्शन अजूनही सुरूच आहे.
चित्रपटातील सर्व कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षक प्रभावित
ऋषभ शेट्टी यांचा “कांतारा चॅप्टर 1” हा चित्रपट होम्बाले फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात रुक्मिणी वसंत, जयराम, गुलशन देवैया आणि सप्तमी गौडा यांच्यासह इतर कलाकार विविध भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटातील सर्व कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. “कांतारा: अ लेजेंड चॅप्टर 1” हा 2022 च्या हिट चित्रपट “कांतारा: अ लेजेंड” चा प्रीक्वल आहे.
चित्रपट लवकरच 600 कोटींच्या घरात पोहोचेल
चित्रपटाची क्रेझ पाहता हा चित्रपट लवकरच 600 कोटींच्या घरात पोहोचेल यात शंका नाही. तसेच या चित्रपटाच्या यशानंतर आता प्रेक्षकांना ‘कांतारा चॅप्टर 2’ ची प्रतिक्षा आहे. प्रेक्षक ‘कांतारा चॅप्टर 2’ च्या स्टोरीबद्दल उत्सुक असलेले पाहायला मिळत आहेत. तशा कमेंट्सही सोशल मीडियावर येत आहेत.
