
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. आता देखील सोशल मीडियावर एक खास आणि 44 वर्ष जुनी गोष्ट व्हायरल होत आहे. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर यांच्या लग्नाची पत्रिका सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर यांचं लग्न 23 जानेवारी 1980 मध्ये झालं होतं. ऋषी कपूर आणि नीतू कपूर आधी चांगले मित्र होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम बहरलं… अखेर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
सोशल मीडियावर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नाची पत्रिका तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, चाहते देखील दोघांच्या लग्नाच्या पत्रिकेवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या लग्नाची पत्रिका पाहिल्यानंतर चाहत्यांच्या देखील जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
लग्नाची पत्रिका आरके स्टुडिओच्या लेटर हेडवर छापल्यासारखं दिसते. सर्वात वर आरके स्टुडिओचे चिन्ह होते आणि त्यानंतर लग्नाशी संबंधित माहिती देण्यात आली होती. ऋषी आणि नीतू यांचं लग्न चेंबूरच्या आरके स्टुडिओमध्ये पार पडलं. सायंकाळी 6.30 ते 9 या वेळेत हा विवाह संपन्न झाला.
स्टुडिओच्या आयकॉन्स आणि आमंत्रितांमध्ये पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, प्रेमनाथ आणि रणधीर कपूर यांसारख्या दिग्गजांची नावे आहेत. आज ऋषी कपूर जगात नसले तरी, कपूर कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्रमात कुटुंबियांना आजही ऋषी कपूर यांची आठवण येते.
ऋषी कपूर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, ते आज जगात नसले तरी, त्यांच्या बद्दल कायम चर्चा रंगत असतात. एवढंच नाहीतर, त्यांचे सिनेमे देखील चाहते तितक्याच आवडणीने पाहातात. ऋषी कपूर यांचं निधन 29 एप्रिल 2020 मध्ये झालं. त्यांच्या निधनानंतर चाहते आणि सेलिब्रिटींना फार मोठा धक्का बसला होता.
कोरोना काळत ऋषी कपूर यांचं निधन झालं. ज्यामुळे त्यांच्या लेकीला देखील वडिलांचं अंतिमदर्शन घेता आलं नाही. ऋषी कपूर यांच्या अनेक आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत.