Genelia Deshmukh होणार आई! रितेश देशमुख याच्याकडून सत्य समोर

Genelia Deshmukh | जिनिलिया देशमुख तिसऱ्या बाळाला देणार जन्म! व्हायरल व्हिडीओवर अभिनेता रितेश देशमुख याची प्रतिक्रिया... सध्या सर्वत्र जिनिलिया - रितेश यांच्या खासगी आयुष्याची चर्चा

Genelia Deshmukh होणार आई!  रितेश देशमुख याच्याकडून सत्य समोर
| Updated on: Sep 11, 2023 | 1:15 PM

मुंबई : 11 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री जिनिलिया डिसूझा – देशमुख (Genelia Deshmukh) आणि अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता देखील बॉलिवूडचं क्यूट कपल एका महत्त्वाच्या कारणामुळे चर्चेत आलं आहे. नुकताच सोशल मीडियावर जिनिलिया आणि रितेश यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. व्हिडीओत पोज देताना जिनिलिया हिने पोटावर हात ठेवला होता, तर दुसरीकडे अभिनेता पत्नीची काळजी घेताना दिसत होता. अशात जिनिलिया तिसऱ्यांदा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. आता रंगणाऱ्या चर्चांवर रितेश देशमुख याने प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या प्रतिक्रियेची चर्चा रंगत आहे.

सोमवारी अभिनेत्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘आणखी २ – ३ मुलं असती तरी मला काही हरकत नसती… पण दु्र्भाग्य असं आहे की, हे असत्य आहे…’ असं म्हणत रितेश याने जिनिलिया हिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रितेश आणि जिनिलिया यांची चर्चा सुरु आहे.

दरम्यान, शनिवारी रितेश आणि जिनिलिया एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. कार्यक्रमात दोघेही खूप क्यूट दिसत होते. रितेश निळ्या रंगाच्या पँटसह पांढऱ्या शर्टमध्ये दिसला, तर जेनेलिया हिने जांभळ्या रंगाचा डीप नेक शॉर्ट ड्रेस घातला होता. दोघे एकत्र फार सुंदर दिसत आहेत. दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 

 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिनिलिया प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रितेश याने रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा असल्याचं सांगितलं आहे. जिनिलिया आणि रितेश यांना दोन मुलं आहे. सेलिब्रिटी किड्स म्हणून जिनिलिया आणि रितेश यांची मुलं लोकप्रिय आहेत. एवढंच नाही तर जिनिलिया आणि रितेश यांना फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. जिनिलिया आणि रितेश कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.

रितेश आणि जिनिलिया यांचं रिलेशनशिप आणि लग्न

रितेश आणि जिनिलिया यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतक २०१२ मध्ये लग्न केलं. दोघांच्या लग्नात अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर २०१४ मध्ये रितेश आणि जिनिलिया यांनी रियान याचं जगात स्वागत केलं. त्यानंतर २०१६ मध्ये रितेश आणि जिनिलिया यांनी दुसरा मुलगा राहिल याला जन्म दिला.