रितेश देशमुख याच्या ‘राजा शिवाजी’चित्रपटाचे पोस्टर रिलीज, विकी कौशलची पहिली प्रतिक्रीया आली….

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या शुभ मुहूर्तावर अभिनेता रितेश देशमुख याचा चित्रपट 'राजा शिवाजी'चा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाले आहे. मीडियावर यामुळे एकच चर्चा सुरु आहे...

रितेश देशमुख याच्या ‘राजा शिवाजी’चित्रपटाचे पोस्टर रिलीज, विकी कौशलची पहिली प्रतिक्रीया आली....
ritesh deshmukh films raja shivaji poster Unveiled
| Updated on: Feb 20, 2026 | 9:43 PM

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीच्या मुहूर्तावर रितेश देशमुख यांच्या बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक बाहेर आला आहे. या चित्रपटात अर्थातच रितेश देशमुख याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेली आहे. या रितेश देशमुख या चित्रपटात शिवरायांसारखा दिसत नाही असेही काही युजर्सचे म्हणणे आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी शिवाजी महाराज साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. बॉलीवूड स्टार आणि नुकताच छावातून संभाजी महाराजांचा रोल करणारा अभिनेता विकी कौशल याने या चित्रपटाच्या पोस्टरवर आपली प्रतिक्रीया दिली आहे.

अभिनेता विकी कौशल याची कमेंट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील तोच करत आहे.त्यांनी आज २० फेब्रुवारी रोजी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा पहिला लूक येताच सोशल मीडियावर हंगामा झाला आहे. अभिनेता विकी कौशल याने या पोस्टवर ‘आबा साहेब’ अशा शब्दात कमेंट केली आहे. संभाजी महाराज त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांना आबा साहेब अशी हाक मारायचे…

पॅन इंडिया फिल्म

रितेश देशमुख याचा हा ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची उत्सुकता या पोस्टरमुळे ताणली गेली आहे. त्याच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा त्याचा पहिलाच प्रयत्न आहे. या चित्रपट पॅन इंडिया स्तरावर प्रस्तुत केला जाणार आहे. तसेच हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेत बनवला जाणार आहे. त्यानंतर तमिळ,तेलुगु, कन्नड आणि मल्यायम सारख्या अन्य भारतीय भाषातही तो रिलीज होणार आहे.

केव्हा रिलीज होणार ?

पोस्टर जारी झाल्यानंतर आता रिलीज डेटचा देखील सस्पेन्स उघड झाला आहे. या चित्रपट १ मे २०२६ रोजी रिलीज होणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज होणार आहे. आपल्या मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी मुघलांशी दिलेला लढा या चित्रपटात दाखवला जाणार आहे. रितेश देशमुख याने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करताना कॅप्शन देखील लिहीली आहे. ती अशी आहे की ‘जब अंधेरा प्रकाश की तलाश में था, तब एक ज्वाला ने उभार लिया’. हा चित्रपट दोन महिन्यांनी रिलीज होणार असल्याने तो छावा सारखा विक्रम करतो का हे पाहावे लागेल.

येथे पोहा पोस्ट –