AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohini Ninawe : निर्मात्यानं मला मालिकेतून काढलं…लेखिका रोहिणी निनावेंचा स्टार प्रवाहच्या गाजलेल्या मालिकेबद्दल खुलसा

Rohini Ninawe : सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांनी आजवर अनेक गाजलेल्या मालिकांचं लेखन केलेलं आहे. मात्र, स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकेतून अचानक त्यांना काढून टाकण्यात आलं. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय.

Rohini Ninawe : निर्मात्यानं मला मालिकेतून काढलं...लेखिका रोहिणी निनावेंचा स्टार प्रवाहच्या गाजलेल्या मालिकेबद्दल खुलसा
| Updated on: Oct 04, 2026 | 7:43 PM
Share

सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे यांच्या इंडस्ट्रीतील करिअरला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. रोहिणी यांनी दामिनीच्या १०५० भागांच्या यशानंतर, अवंतिका, अवघाचि संसार, ऊन पाऊस, कळत नकळत , अधूरी एक कहाणी, म्रुण्मयी , अर्थ , अल्बम, मन उधाण वाऱ्याचे, पुढचं पाऊल , माझ्या नवऱ्याची बायको अशा मराठी आणि कुसुम ,संजीवनी , इस प्यार को क्या नाम दूं, यहा मैं घर घर खेली, प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा.. अशा हिंदी मालिकाही लिहिल्या. अनेक वर्ष यशस्वी मालिकांचं लेखन करूनही रोहिणी यांना स्टार प्रवाहच्या एका मालिकेतून अचानक काढण्यात आलं. याबद्दल रोहिणी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलंय.

मराठी मालिकांबद्दल बोलताना रोहिणी निनावे म्हणाल्या की, ‘आधी आठवड्यातून एकदा मालिका होती, नंतर पाच दिवसांची करण्यात आली, मग सहा दिवसांची आणि आता सात दिवसांची. त्यामुळे आता रोज उठून लिहावं लागतं. त्यात महाएपिसोड असतात, महासंगम असतो, सगळे सण असतात, लग्न असतात. त्यात अनेक बदल होतात. सतत ऍडजस्ट करावं लागतं. मी प्रत्येक परिस्थितीत लिखाण केलेलं आहे. माझं ऑपरेशन झालेलं, 13 टाके पडले होते, तरी दुसऱ्यादिवशी मी एपिसोड लिहिला. 1000 मालिकांचे जे भाग होतात, ते मला विचित्र वाटतं.’

पुढे, मालिका लिहिताना लेखकाला स्वातंत्र्य दिलं जातं का? असं विचारलं असता रोहिणी म्हणाल्या की, ‘नाही. कारण, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. चॅनलवाले, निर्माते, अभिनेते त्यांची मतं वेगळी असतात. सगळे सूचना देतात, मग तुम्हाला तसं लिहावं लागतं. काही कलाकार स्वतःचा ट्रॅक लिहून आणतात. बऱ्याच लोकांना निगेटिव्ह रोल करायचा नसतो.’

रोहिणी निनावे यांचा खुलासा

मालिका मिळाली आणि अचानक रिजेक्ट केलं जातं, यावर रोहिणी ‘आई कुठे काय करते‘ या स्टार प्रवाहच्या मालिकेबद्दल सांगताना म्हणाल्या की, ‘त्या मालिकेवर मी खूप काम केलं. पण निर्मात्याला वाटलं मी चांगलं लिहित नाही, त्यामुळे त्याने मला त्या मालिकेतून काढून टाकलं. माझं असं म्हणणं आहे की, तुम्ही बोलून सांगू शकता. माझ्यात लेखनगुण नाही, असं नाहीये ना. विनोदी किंवा रहस्यमय मालिका असतील तर मी समजू शकते. पण, ‘आई कुठे काय करते‘ ही मालिका मी न लिहावी, यात काहीच नव्हतं. मला आजपर्यंत यामागचं कारण समजलेलं नाहीये.’ ‘राजश्री मराठी‘ला दिलेल्या मुलाखतीत रोहिणी निनावे बोलत होत्या.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात