5

Kubbra Sait: वयाच्या 17व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावली; कुब्रा सैतकडून लैंगिक शोषणाबद्दल धक्कादायक खुलासा

ती घटना झाल्यानंतर अनेक वर्षांनी कुब्राने आईला त्याबद्दल सांगितलं. एका फॅमिली फ्रेंडने जवळपास दोन-अडीच वर्षे शोषण केल्याचा धक्कादायक खुलासा तिने या पुस्तकात केला आहे. संबंधित व्यक्तीचा उल्लेख तिने पुस्तकात 'एक्स' असा केला आहे.

Kubbra Sait: वयाच्या 17व्या वर्षी व्हर्जिनिटी गमावली; कुब्रा सैतकडून लैंगिक शोषणाबद्दल धक्कादायक खुलासा
Kubbra SaitImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 5:01 PM

‘सेक्रेड गेम्स’ (Sacred Gamed) या वेब सीरिजमध्ये कुक्कुची भूमिका साकारलेली अभिनेत्री कुब्रा सैत (Kubbra Sait) हिने तिच्या ‘ओपन बुक: नॉट क्वाएट अ मेमॉइर’ या पुस्तकात लैंगिक शोषणाचा (sexually abused) खुलासा केला आहे. किशोरवयीन असताना जवळच्याच एका व्यक्तीने तिचं लैंगिक शोषण केल्याचं तिने म्हटलंय. ती घटना झाल्यानंतर अनेक वर्षांनी कुब्राने आईला त्याबद्दल सांगितलं. एका फॅमिली फ्रेंडने जवळपास दोन-अडीच वर्षे शोषण केल्याचा धक्कादायक खुलासा तिने या पुस्तकात केला आहे. संबंधित व्यक्तीचा उल्लेख तिने पुस्तकात ‘एक्स’ असा केला आहे. अनेक वर्षांनंतर अलीकडेच आपल्या आईने त्या घटनेबद्दल माफी मागितल्याचंही तिने त्यात लिहिलंय.

कुब्रा त्यावेळी 17 वर्षांची होती. आपल्या कुटुंबीयांसोबत ती नियमितपणे बेंगळुरूतील एका रेस्टॉरंटमध्ये जायची. त्या रेस्टॉरंटचे मालक कुब्रा आणि तिचा भाऊ दानिश यांच्याशी खूप चांगले वागायचे. त्यांनी कुब्राच्या आईला आर्थिक मदतही केली होती. त्या मदतीनंतरच त्याने लैंगिक शोषणाला सुरुवात केल्याचं कुब्राने पुस्तकात लिहिलं.

हे सुद्धा वाचा

इन्स्टा पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Kubbra Sait (@kubbrasait)

“आर्थिक अडचणीत असताना मदत मिळाल्याने आईला दिलासा मिळाला होता. मात्र त्याच दिवशी कारमध्ये मी त्या व्यक्तीसोबत मागे बसली असताना त्याने माझ्या मांडीवर हात ठेवला. त्या क्षणी मी सुन्न झाले होते. तो व्यक्ती नंतर सतत आमच्या घरी येऊ लागला. माझ्या आईसमोरच त्याने अनेकदा माझ्या गालावर मुका दिला. ‘माझी कुब्रती, तू माझी सर्वांत आवडती आहेस’, असं ते म्हणायचे. हे सगळं मला पटत नसतानाही मी शांत होते. एके दिवशी ते मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि तिथे त्यांनी मला किस करण्याचा प्रयत्न केला. हे सर्व घडायला पाहिजे नव्हतं, मी ओरडायला पाहिजे होतं, मी मदतीसाठी धावायला पाहिजे होतं. पण मी ते कोणालाच सांगू शकले नाही”, असं कुब्राने पुस्तकात लिहिलं.

कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला या घडलेल्या घटनेबद्दल सांगितल्यास मी तुला उद्ध्वस्त करेन, अशी धमकी त्याने कुब्राला दिली होती. या घटनेबाबत तिच्या आईलाही माहित नव्हतं. अनेक वर्षांनंतर आईला ते सर्व सांगण्याचं धाडस कुब्राने केलं. त्यानंतर आता आपल्या पुस्तकात कुब्राने लैंगिक शोषणाबद्दलचा खुलासा केला.

Non Stop LIVE Update
रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना फटकारलं, '..तीन महिने काय केलं?'
रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना फटकारलं, '..तीन महिने काय केलं?'
शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर काँग्रेस नेत्याचं मोठं भाष्य
शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीवर काँग्रेस नेत्याचं मोठं भाष्य
उल्हासनगरमधील नामांकित कंपनीत ब्लास्ट, रोहित पवार घटनास्थळी... म्हणाले
उल्हासनगरमधील नामांकित कंपनीत ब्लास्ट, रोहित पवार घटनास्थळी... म्हणाले
2024 मध्ये मुख्यमंत्री कोण? फडणवीस की शिंदे? भाजप आमदाराचा दावा काय?
2024 मध्ये मुख्यमंत्री कोण? फडणवीस की शिंदे? भाजप आमदाराचा दावा काय?
प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
'विजय वडेट्टीवार आहे तरी कोण?', भाजपच्या बड्या नेत्याचा थेट सवाल
'विजय वडेट्टीवार आहे तरी कोण?', भाजपच्या बड्या नेत्याचा थेट सवाल
उल्हासनगरच्या सेंच्युरीत भीषण स्फोट, काय कारण अन् किती कामगार दगावले?
उल्हासनगरच्या सेंच्युरीत भीषण स्फोट, काय कारण अन् किती कामगार दगावले?
नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान, नाग नदीवरील पूल कोसळला अन्...
नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान, नाग नदीवरील पूल कोसळला अन्...
विजय वडेट्टीवारांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी काय?
विजय वडेट्टीवारांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी काय?
'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आलेल्या तरूणीला मंडपातच भोवळ अन्...
'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आलेल्या तरूणीला मंडपातच भोवळ अन्...