
Saif Ali Khan Case: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या शरिफुल इस्लामच्या डाव्या हाताचे ठसे आणि सैफच्या घरात सापडलेल्या आरोपीच्या हाताचे ठसे जुळल्याची गुन्हे शाखेची मुंबई सेशन कोर्टात माहिती दिली आहे. शरिफुल इस्लामने दाखल केलेल्या जामीन अर्जाला विरोध करताना मुंबई गुन्हे शाखेने कोर्टाला माहिती दिली आहे. सैफच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फोटो आणि आरोपीचा चेहरा देखील जुळल्याचा गुन्हे शाखेने दावा केला आहे.
आरोपीला जामीन मंजूर केल्यास तो बांगलादेश येथे पळून जाण्याची तसेच असे गुन्हे करण्याची भीती व्यक्त करत त्याच्या जमिनीला गुन्हे शाखेने विरोध केला आहे. सैफवर झालेल्या हल्ल्याची कहाणी काल्पनिक असल्याचा दावा करत शरिफुल इस्लामने जमीन अर्ज दाखल केला होता.
मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद म्हणाला, ‘मी निर्दोष असून माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा हा काल्पनिक आहे…’ जामिनाची मगणी करत त्याने असा दावा केला आहे. न्यायालयाने देखील त्याच्या या अर्जाची दखल घेऊन सरकारी पक्षाला 21 जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अखेर आरोपीचा चेहरा देखील जुळल्याचा गुन्हे शाखेने दावा केला आहे. शरीफुल सध्या आर्थर मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे.