सैफ अली खान प्रकरणी मोठी अपडेट, तपास अधिकारी तडकाफडकी बदलला, कारण…
आता सैफ अली खान प्रकरणातील पहिला तपास अधिकारी बदलल्याचे पाहायला मिळत आहे.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या एका चोराने चाकू हल्ला केला. गुरुवारी (16 जानेवारी) सैफ अली खानवर हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक केली. विजय दास असे या आरोपीचे नाव आहे. ठाण्यातील कासारवडवली भागातून त्याला अटक करण्यात आली. तर दुसरीकडे आज सैफ अली खानला लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्याला डॉक्टरांनी पुढील काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी तपास करणारा पोलीस अधिकारी बदलण्यात आला आहे. हा तपास अधिकारी का बदलला त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर 4 दिवसांनी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. मोहम्मद शहजाद उर्फ विजय दास असे या आरोपीचे नाव होते. पोलिसांकडून त्याची कसून चौकशीही सुरु होती. मुंबई न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. त्यानंतर त्याने पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे केले होते. या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाचा पोलीस तपास अधिकारी बदलल्याचे पाहायला मिळत आहे.
तपास अधिकाऱ्याची बदली
या प्रकरणाचा तपास पीआय दर्जाचे अधिकारी सुदर्शन गायकवाड करत होते. मात्र त्यांच्याऐवजी आता अजय लिंगनूरकर हे या प्रकरणाचा तपास करणार आहेत. नुकतीच त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता या प्रकरणातील तपास अधिकारी का बदलण्यात आले, त्यामागचे कारण काय, याची माहिती समोर आलेली नाही. तसेच तपास अधिकारी बदलण्याचे कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा कसून तपास सुरु आहे. आता या प्रकरणी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणी अटकेत असलेला आरोपी मोहम्मद शरीफुलने हल्ला करण्यापूर्वी नोकरी सोडली होती. मात्र तेव्हा त्याने एक चाकू चोरला होता. चोरलेला चाकू बॅगेत घेऊन तो वावरत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच हल्ला केल्यानंतर मोहम्मद शरीफुल हा काही वेळासाठी वांद्रेच्या बँडस्टँड परिसरात गेला. तिथे तो काही वेळ बसला. यानतंर पुन्हा तो चालत चालत वांद्रे परिसरात आला, असे चौकशीत समोर आले आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणी नवनवीन खुलासे

मोहम्मद शरीफुलची टोपी महत्त्वाचा पुरावा
या घटनेत मोहम्मद शरीफुलची टोपी हा महत्वाचा पुरावा ठरणार आहे. जेव्हा मोहम्मद शरीफुल हा पायऱ्यांनी चालत गेला, तेव्हा त्याने आपल्या बॅगेत टोपी ठेवली होती. सैफ अली खानच्या घरात जेव्हा झटापट झाली, तेव्हा त्याच्या डोक्यावर टोपी होती. त्यामुळे ती टोपी महत्वाचा पुरावा ठरणार आहे. तसेच हल्लेखोर मोहम्मद शरीफुलची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी फेशअल आयडी प्रणालीचा वापर केला असल्याची माहिती समोर आली आहे.