AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नव्हे, ‘या’ स्टार्सवरही आधी झाला होता हल्ला, दुसरं नाव तर…

अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला ही काही एखाद्या फिल्म स्टावर हल्ला होण्याची पहिलीच घटना नाही. अशा हल्ल्यांची एक लांबलचक यादी आहे, ज्यामध्ये सलमान खान, शाहरुख खान, राकेश रोशनसह अनेक बडे स्टार्स बळी ठरले आहेत.

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नव्हे, 'या' स्टार्सवरही आधी झाला होता हल्ला, दुसरं नाव तर...
| Updated on: Jan 17, 2025 | 9:50 AM
Share

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे राज्यभरासह बॉलिवूडमध्येही मोठी खळबळ उडाली आहे. आधी बाबा सिद्दिकींची हत्या, सलमान खानला सतत येणाऱ्या धमक्या आणि आता सैफच्या घरात चोर घुसून त्याने केलेला हल्ला यामुळे चित्रपट कलाकारांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खुद्द फिल्मी दुनियेतील स्टार्सही काळजी करताना दिसतात. बुधवारी मध्यरात्री सैफच्या वांद्रे येथील घरात एक व्यक्ती घुसली, तो सैफचा मुलगा जेहच्या रूममध्ये होता. त्याने सैफच्या घरातील केअरटेकरकडून पैशांची मागणी केली, त्यांचा वादही झाला. याचदरम्याम सैफ मध्ये पडला आणि त्याने त्या चोराला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांची झटापट झाली आणि तोराने सैफवर चाकूने वार करत मोठा हल्ला केला. सैफवर लीलावतीमध्ये सर्जरी झाली असून सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

मात्र अभिनेता सैफ अली खानवर झालेला हा हल्ला ही काही एखाद्या फिल्म स्टावर हल्ला होण्याची पहिलीच घटना नाही. यापूर्वीही बॉलिवूडमधील अनेक स्टार्स टार्गेट करण्यात आले होते, काहींवर तर जीवघेणा हल्ला ही झाला होता. कोण होते ते स्टार्स जाणून घेऊया

सलमान खान

यामध्ये सगळ्यात आधी जाणून घेऊया ते सलमान खानबद्दल. गेल्या अनेक महिन्यांपासून सलमान खानला सतत धमक्या दिल्या जात आहेत. विशेषतः लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानला टार्गेट करण्याची धमकी दिली जात आहे. बॉलीवूडचा दबंद स्टार असलेला सलमान खान 1998 च्या काळवीट प्रकरणी कायदेशीर अडचणीत आहे. या प्रकरणात सैफचंही नाव आलं होतं. 2018 मध्ये पहिल्यांदा लॉरेन्सने सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. गेल्या वर्षीही एप्रिल हिन्यात सलमानच्या घरावर गोळ्या झाडण्यात आल्या गेल्या होत्या. त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये बाबा सिद्दीकीची हत्या करण्यात आली होती. आता सलमानच्या अपार्टमेंटची बाल्कनी आणि खिडक्या बुलेटप्रूफ काचेने झाकण्यात आल्या आहेत.

गुलशन कुमार

टी-सीरीजचे मालक गुलशन कुमार यांची झालेली हत्या ही बॉलिवूडमधील एखादी मोठी व्यक्ती बळी ठरल्याची पहिली घटना होती. गुलशन कुमार हे मुंबईतील अंधेरी उपनगरातील शिवमंदिरात जात असत. १२ ऑगस्ट १९९७ रोजी पूजा करून परतत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. 1997 साली हत्येपूर्वी काही दिवस आधी त्यांना धमकीचे फोन आले होते, असे पोलिसांनी नंतर स्पष्ट केले होते.

राकेश रोशन

‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाच्या यशानंतर अंडरवर्ल्डने राकेश रोशन यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. राकेश रोशन यांन खंडणी देण्यास नकार दिल्याची चर्चा होती. त्यानंतर 21 जानेवारी 2000 रोजी सुनील विठ्ठल गायकवाड आणि सचिन कांबळे नावाच्या दोघांनी राकेश रोशन यांच्यावर त्यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या झाडल्या. नंतर त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.

शाहरुख खान

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानलाही अंडरवर्ल्डकडून अनेकदा धमक्या मिळाल्या आहेत. या धमक्यांमुळे ऑक्टोबर 2023 मध्ये शाहरुख खानला झेड प्लस सुरक्षा देण्यात आली होती. 1990 च्या दशकात गँगस्टर अबू सालेमने अनेक वेळा त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता असे म्हटले जाते.

प्रीती झिंटा

अंडरवर्ल्ड माफियांनीही अभिनेत्री प्रीती झिंटावरही दबाव आणण्याचा प्रयत्न केला. 2001 मध्ये, चोरी चोरी चुपके चुपके चित्रपटाशी संबंधित कायदेशीर कारवाई दरम्यान, चित्रपट निर्माता नसीम रिझवी आणि फायनान्सर भरत शाह यांना अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले. आपल्याकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागणारे फोन आले होते, असे प्रीती झिंटाने मुंबई न्यायालयात दिलेल्या साक्षीत सांगितले होते.

पूनम धिल्लन

या महिन्याच्या सुरुवातीलाच अभिनेत्री पूनम धिल्लनच्या घरी चोरी झाली होती. खरंतर त्यांना त्यांच्या फ्लॅटमध्ये पेंटिंग करायचं होतं. मात्र आरोपींनी कपाटातून 1 लाख रुपये किमतीचे हिऱ्याचे झुमके, 35 हजार रुपये रोख आणि 500 ​​अमेरिकन डॉलर्स चोरून नेले होते.

मुश्ताक खान आणि सुनील पाल

मुश्ताक खानला नुकतेच यूपीमध्ये एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते, जिथे त्याचे अपहरण करण्यात आले होते. बिजनौरमध्ये त्यांना ओलीस ठेवण्यात आले आणि त्यांच्या मोबाईलवरून दोन लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले. त्याचप्रमाणे सुनील पाल यालाही ओलीस ठेवण्यात आले होते, त्याच्याकडून 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती आणि 8 लाख रुपये देऊन त्याची सुटका करण्यात आली होती.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.