Saif Ali Khan attack : हल्ल्यात फक्त मीच नव्हे मुलगाही जखमी… सैफ अली खानचा 8 महिन्यानंतर मोठा खुलासा !

Two Much With Kajol & Twinkle : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता सैफ अली खान, त्याचा "खिलाडी" सह-कलाकार अक्षय कुमारसह, प्राइम व्हिडिओच्या लोकप्रिय चॅट शो "टू मच विथ काजोल अँड ट्विंकल" मध्ये दिसला. याच शो दरम्यान, त्याने त्याच्यावरील हल्ल्याबद्दल एक महत्त्वाचा खुलासा केला.

Saif Ali Khan attack : हल्ल्यात फक्त मीच नव्हे मुलगाही जखमी... सैफ अली खानचा 8 महिन्यानंतर मोठा खुलासा !
सैफ अली खान
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Oct 09, 2025 | 9:46 AM

Two Much With Kajol & Twinkle : प्रसिद्ध अशा पटौडी कुटुंबासोबत या वर्षाच्या सुकूवातीलच एक धक्कादायक, हादरवणारी घटना घडली. अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरात चोर घुसला आणि त्याने सैफवर हल्लाही केला. या हल्लायच्या तब्बल 8 महिन्यानंतर खुद्द सैफ हाच या विषयावर बोलला असून त्याने अनेक खुलासे केला. सैफ अली खान हा नुकताच, अक्षय कुमार याच्यासह ‘टू मच’ या काजोल आणि ट्विंकल खन्नाचा ओटीटी चॅट शोमध्ये सहभागी झाला होता. त्याच चॅट शोमध्ये तो त्याच्यावर झालेला हल्ला, तेथील परिस्थिती यावर खुलेपणाने बोलला. जानेवारीत झालेल्या या हल्ल्यात सैफ गंभीररित्या जखमी झाला होता. एवढंच नव्हे तर या हल्ल्यात छोटा मुलगा जेह देखील जखमी झालयाचे सैफने पहिल्यांदाच खुलेपणाने सांगितले.

त्या दिवशी नेमकं काय घडलं तेही सैफने नूमद केलं. ” त्यादिवशी करीना बाहेर गेली होती आणि आम्ही चित्रपट पाहत होतो. फिल्म संपव्यावर आम्ही झोपायला गेलो. बराच उशीर झाला होता. मला वाटतं करीना परत आली तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते. आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या आणि मग झोपी गेलो. अचानक, आमची मेड धावत खोलीत आली आणि म्हणाली की जेह बाबांच्या खोलीत कोणीतरी आहे. त्याच्याकडे चाकू होता आणि तो पैसे मागत होता.” असं सैफने सांगितलं.

हल्ल्यात जखमी झाला जेह

सैफ पुढे म्हणाला, “तिचं बोलणं ऐकताच मी लगेच जेहच्या खोलीत धावलो. तो माणूस चाकू घेऊन जेहच्यावर उभा होता. त्यामुळे जेहच्या हाताला दुखापत झाली होती, त्याच्या हातावर एक छोटासा वार होता. मी खोलीत गेलो आणि त्या माणसाला पाहिले, मला वाटले की तो माझ्यापेक्षा लहान आहे, आकाराने माझ्यापेक्षा फार मोठा नाही आणि मी त्याच्या दिशेने उडी मारली. पण नंतर मला माझ्या मुलाने मला सांगितलं की मी चुकलो, मी त्याच्या दिशेने उडी मारायला नको होती, उलट मी त्याला ठोसा मारायला हवा होता.” असं सैफ म्हणाला.

 

तुम्ही मरणार आहात का ? लेकाने सैफला विचारला होता प्रश्न

त्याच घटनेसंद्रभात पुढे बोलताना सैफ म्हणाला, “त्याने (चोराने) मला पाहिले आणि दोन्ही हातात चाकू घेऊन माझ्यावर हल्ला करायला सुरुवात केली. त्याने मागून माझ्यावरही वार केले. आम्ही भांडत होतो. त्याच क्षणी, आमची घरकाम करणारी महिला गीता आली आणि तिने त्याला दूर ढकलून देऊन माझा जीव वाचवला. माझ्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. माझी पाठ प्रचंड दुखत होती. तैमूरने मला त्या अवस्थेत पाहिले तेव्हा त्याने विचारले, “ओह माय गॉच, तुम्ही मरणार आहात का?” मी त्याला म्हटलं, “नाही, मला फक्त लागलं आहे”.  त्यानंतर आम्ही ठरवलं की  करीना मुलांना घेऊन लोलोच्या (करिश्मा कपूर) घरी जाईल, पण तैमूरला मात्र माझ्याचसोबत यायचं होतं. त्याला पाहून मी शात झालो ” अशा शब्दांत सैफने त्या थरारक रात्रीचे वर्णन केलं.