
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या आगामी टायगर 3 चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामध्ये सलमान खान याच्यासोबत कतरिना कैफ ही मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट (Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खान आणि पूजा हेगडे यांचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसला होता. या चित्रपटातून बिग बाॅस (Bigg Boss) फेम शहनाज गिल आणि श्तेवा तिवारी हिची लेक पलक तिवारी यांनी बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. शहनाज गिल हिच्या अभिनयाचे काैतुकही अनेकांनी केले.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटाकडून सलमान खान आणि चित्रपट निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. मुळात म्हणजे सलमान खान याचा किसी का भाई किसी की जान हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवलीये.
नुकताच साजिद नडियाडवाला यांचा सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे सत्यप्रेम की कथा हा चित्रपट धमाका करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी देखील झालाय. या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केलीये. कियारा अडवाणी आणि कार्तिक आर्यन यांची जोडी परत एकदा हिट ठरलीये.
साजिद नडियाडवाला यांनी एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये साजिद नडियाडवाला यांनी सलमान खान याच्या किक 2 चित्रपटाबद्दल अत्यंत मोठे अपडेट दिले आहे. किक हा सलमान खान याच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे. आता किक 2 हा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान खान हा धमाका करताना दिसणार आहे. टायगर 3 नंतर सलमान खानचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.
साजिद नडियाडवाला म्हणाले की, किक 2 ची स्क्रीप्ट तयार आहे. विशेष म्हणजे सलमान खान याने देखील किक 2 ची स्क्रीप्ट वाचली आहे. मात्र, आम्हाला थोडासा वेळ किक 2 साठी लागणार आहे. कारण तो एक मोठा चित्रपट आहे आणि त्यासाठी तयारी देखील तेवढीच मोठी आहे. यावेळी देखील किक 2 मध्ये धमाका होणार हे मी नक्कीच सांगून शकतो असेही साजिद नडियाडवाला हे म्हणाले आहे.