इंटिमेट सीनला नकार दिलास तर…, सलमान खानच्या अभिनेत्रीसोबत नेमकं झालं तरी काय? धक्कादायक खुलासा करत म्हणाली…
Nauheed Cyrusi instagram, Nauheed Cyrusi video, Song Piya Basanti Re, Anwar actress, actress intimate scenes, Nauheed Cyrusi life, Nauheed Cyrusi film, salman khan actress

अभिनेता सलमान खान याने अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये येण्याची संधी मिळाली. पण सलमान खान याच्यासोबत काम केल्यानंतर अनेक अभिनेत्री झगमगत्या विश्वापासून दूर झाल्या. अशाच अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे, नौहीद सेरुसी (Nauheed Cyrusi)… नौहीद सेरुसी हिने फक्त सिनेमांमध्ये काम केलं नाही तर, अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. आता अनेक वर्षांनंतर अभिनेत्री 2026 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘जब खुली किताब’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सांगायचं झालं तर, नौहीद कायम रुपेरी पडद्यापासून दूर असते, ज्यामुळे चाहते देखील तिच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात. पण आता नौहीद तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, स्पष्ट वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
एवढंच नाही तर, सिनेमांमध्ये भूमिका साकारण्याची संधी का नाही मिळत… या प्रश्नावर देखील अभिनेत्री मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनयाच्या दुनियेतून बाहेर पडून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनलेली नौहीद सिरुसी स्वतःचे व्हिडिओ वारंवार शेअर करत असते. आता तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये चाहते तिला तिचा आगामी सिनेमा किंवा शो आहेत का, असं विचारताना दिसत आहेत.
यावर नौहीद सिरुसी म्हणते, ‘सध्याच्या काळात फिल्म इंडस्ट्रीमध्ये असणं फार चागंली गोष्टी आहे… पण करारमध्ये एक अट कायम असते आणि ती म्हणजे, तुम्हाला इंटिमेट सीन करावे लागतील… मला तर आता असं वाटतं फालतू किसिंग सीन सिनेमात टाकले जातात. हे सांगताना मला दुःख होत आहे, पण मला नाही वाटत की मी कोणत्या सिनेमात किसिंग सीन देऊ शकते.’
एवढंच नाही तर, निर्माते कधीच पूर्ण पैसे देत नाहीत, कायम 25 टक्क्यांचा हिस्सा स्वतःकडे ठेवतात… नेटवर्किंग सर्कलपासून दूर राहण्याचा देखील अभिनेत्रीच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे. नौहीद हिने या गोष्टीचा देखील स्वीकार केला आहे की, याच कारणामुळे तिच्या करियरवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक प्रोजेक्ट तिच्या हातातून गेले आहेत.
नौहीद सेरुसी हिच्या करियरबद्दल सांगायचं झालं तर, 2003 मध्ये अभिनेत्रीने करियरला सुरुवात केली. बॉलिवूडसोबत अभिनेत्रीने साऊथ सिनेमांमध्ये देखील काम करण्यास सुरुवात केली. नौहीद सेरुसी हिने ‘अनवर’, ‘भूतनाथ’, ‘कुर्बान’, ‘जय हो’ यांसारख्या सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे.