AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | दिवाळीत येणार टायगर 3 चं तूफान, ‘या’ तारखेला पुन्हा दिसणार सलमान खानचा जलवा

Tiger 3 Release Date : बॉलिवूडचा दंबग स्टार सलमान खान याचे चाहते बऱ्याच काळापासून टायगर 3 चित्रपटाची वाट पाहत आहेत. यामध्ये सलमानसह कतरिना कैफ हिची देखील प्रमुख भूमिका असणार आहे. सलमानच्या चाहत्यांसाठी खुशखबरी असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे.

Salman Khan | दिवाळीत येणार टायगर 3 चं तूफान,  'या' तारखेला पुन्हा दिसणार  सलमान खानचा जलवा
दिवाळीत होणार टायगर 3 चा धमाकाImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 02, 2023 | 1:42 PM
Share

मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान (Salman khan) हा दबंग स्टार म्हणून ओळखला जातो. त्याचे चाहते त्याच्या धमाकेदार चित्रपटाच्या प्रतीक्षेत असतात. नेहमीप्रमाणेच चाहते टायगर 3 (Tiger 3 movie) चित्रपटासाठी एक्सायडेट आहेत. टायगर 3 द्वारे सलमान हा बॉक्स ऑफीसचे अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. बऱ्याच काळापासून त्याचा एकही धमाकेदार पिक्चर रिलीज झालेला नाही. त्यामुळेच सर्वांचे लक्ष टायगर 3 कडे लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर सलमानने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

सलमान खानने इन्स्टाग्राम , या त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर टायगर 3 चे ऑफिशिअल पोस्टर शेअर करत रिलीज डेटचा खुलासा केला आहे. या पोस्टनुसार टायगर 3 हा चित्रपट दिवाळीच्या काळात थिएटरमध्ये दाखल होणार आहे. म्हणजेच ही दिवाळी भाईजानची असणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरबद्दल बोलायचे झाले तर, त्यावर सलमान खान आणि कतरिना कैफ हे दोघेही शानदार अंदाजात दिसत आहेत.

सलमानने शेअर केले पोस्टर

हे पोस्टर शेअर करताना सलमान खानने खास कॅप्शनही लिहीली आहे. ‘ (मी) येत आहे !’ Tiger3 on Diwali, असे त्याने नमूद करत कतरिना कैफलाही टॅग केले आहे. हा बहुचर्चित चित्रपटट हिंदी, तामिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही सलमानने लिहीले आहे. कतरिना कैफचा दमदार अंदाजही यात पहायला मिळणार आहे. एवढेच नव्हे तर चित्रपटाच्या या तिसऱ्या भागात अभिनेता इमरान हाश्मी खलनायक बनून सर्वांनाच धक्का देताना दिसणार आहे.

पठाणशी आहे खास कनेक्शन

अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’मध्ये सलमान खानने कॅमिओ केला होता. या चित्रपटात सलमानची एन्ट्री टायगरच्या भूमिकेत झाली होती. ज्याचा थेट संबंध टायगर 3 शी जोडण्यात आला होता. त्यानंतर  सलमानच्या या चित्रपटात शाहरूखही कॅमिओ करणार असून तो पठाणच्या भूमिकेत दिसणार आहे, अशी चर्चा सुरू आहे.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.