AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्षाबंधनानिमित्त सलमान खान बहिण अलवीराच्या घरी; आई हेलेनही सोबत, व्हिडीओ व्हायरल

रक्षाबंधनानिमित्त बॉलिवूड अभिनेता सलमान खान बहिण अलवीराच्या घरी पोहोचला. कुटुंबासोबत साजरा केला खास दिवस. सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ.

रक्षाबंधनानिमित्त सलमान खान बहिण अलवीराच्या घरी; आई हेलेनही सोबत, व्हिडीओ व्हायरल
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 28, 2026 | 5:42 PM
Share

देशभरात 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी हा सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा केला. बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खाननेही यंदाचे रक्षाबंधन आपल्या कुटुंबासोबत खास पद्धतीने साजरे केले.

रक्षाबंधनानिमित्त सलमान खान आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत बहीण अलवीरा अग्निहोत्री हिच्या घरी पोहोचला. यावेळी खान कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. सलमानचा अलवीराच्या घरी जातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून तो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

चाहत्यांकडून व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

या व्हिडीओमध्ये सलमान खान काळ्या रंगाची टोपी आणि टी-शर्ट परिधान केलेला दिसत आहे. त्याच्यासोबत त्याची आई हेलेन देखील दिसत आहे. कुटुंबीयांसोबत रक्षाबंधन साजरे करण्यासाठी सलमानने आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढला.

सलमान खान हा आपल्या बहिणींची विशेष काळजी घेणारा भाऊ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे रक्षाबंधनाचा हा खास दिवस त्याच्यासाठी केवळ एक सण नसून कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधीही असते. सलमान खानचा हा कौटुंबिक अंदाज चाहत्यांनाही आवडला असून सलमान खानचा व्हिडीओ चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केला असून त्यावर यूजर्सकडून व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’मध्ये दिसणार सैनिकाच्या भूमिकेत

दरम्यान, सलमान खानच्या आगामी चित्रपटाचीही सध्या चर्चा आहे. ‘मातृभूमि: मे वॉर रेस्ट इन पीस’ हा बहुप्रतीक्षित वॉर ड्रामा असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात सलमान भारतीय सैन्यातील एका अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.

अपूर्व लाखिया यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटातून देशभक्ती, शौर्य आणि सैनिकांच्या संघर्षाची कथा मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चित्रपटाचा भव्य स्तर असून दमदार अॅक्शनसोबत भावनिक कथानकही पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.

‘सिकंदर’नंतर सलमानच्या या आगामी चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे ‘मातृभूमि’च्या माध्यमातून सलमान बॉक्स ऑफिसवर दमदार पुनरागमन करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

Follow Us
कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविकांसाठी फडणवीसांचा पुढाकार
Nepal Flood : कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविकांसाठी फडणवीसांचा पुढाकार
मोठी खळबळ! महायुतीत नाराजीचे सुर? सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी..
मोठी खळबळ! महायुतीत नाराजीचे सुर? प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी बदलताच... काय घडलं?
गणेशोत्सवाचे दहा दिवस मी पूर्णपणे... मुरलीधर मोहळ यांचं मोठं विधान
गणेशोत्सवाचे दहा दिवस मी पूर्णपणे... मुरलीधर मोहळ यांचे गणेश मंडळाबाबत मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?
पुन्हा नाद करायचा... पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष तीव्र;
पुन्हा नाद करायचा... पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष तीव्र; संदीप वाघेरेंच्या बॅनरची तुफान चर्चा
नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे..
नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे कौतुक
महाप्रलयात जीव मुठीत धरून कुटुंब; प्रत्येक क्षण... नवा थरारक व्हिडिओ
Nepal Flood Update | महाप्रलयात जीव मुठीत धरून कुटुंब; प्रत्येक क्षण... नवा थरारक व्हिडिओ समोर
मुंबई महापौरपदाचा फॉर्म्युला काय? शिंदे गटाला अडीच वर्षांची संधी?
मुंबई महापौरपदाचा फॉर्म्युला काय? शिंदे गटाला अडीच वर्षांची संधी?
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी;
रक्षाबंधननिमित्त किशोरी पेडणेकर, चित्रा वाघ महापौरांच्या निवासस्थानी; स्वामींना बांधणार राखी
ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
MNS On Marathi Sakti | ऑटो-टेक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ; मनसे आक्रमक
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरे...
राजकीय नेत्यांच्याही घरी रक्षाबंधन सणाचा उत्साह; राज ठाकरेंच्या बहिणीसोबतचे खास फोटो समोर