AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यासाठी मी आता म्हातारा झालोय….; Salman Khan ने नाकारली ही सर्वात मोठी ऑफर

सलमान खानला नुकतीच एक मोठी ऑफर देण्यात आली होती. मात्र त्याने ती नाकारली असून,ही ऑफर स्वीकारायला मी म्हातारा झालोय असं म्हणत त्याने आलेल्या मोठ्या संधीला साफ नकार दिला. तसेच त्याला या निर्णयाचा कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलं आहे.

त्यासाठी मी आता म्हातारा झालोय....; Salman Khan ने नाकारली ही सर्वात मोठी ऑफर
salman khan ILPImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 12, 2025 | 4:09 PM
Share

बॉलिवूडचा दबंग खान अर्थातच सलमान खान कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. सध्या बिग बॉस 19 मुळे तो चर्चेत आहे. पण सोबतच सलमान खान अजून एका कारणाने चर्चेत आला तो म्हणजे आयपीएलमुळे. आज जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजे IPLआहे. दर वर्षी या लीगमध्ये अनेक मोठे बदल दिसून येत आहेत आणि शाहरुख खानपासून प्रीती झिंटापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांच्या टीम आहेत. यामध्ये बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचंही नाव जोडलं गेलं असतं. कारण त्याला आयपीएलमध्ये एका संघाचे मालक होण्याची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्याने ती नाकारली.

मी आता म्हातारा झालो आहे.

सलमानने अलिकडेच आयपीएलशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे. सलमान मुंबईतील एका कार्यक्रमात उपस्थित होता, जिथे त्याला आयपीएलमध्ये संघ खरेदी करण्याच्या त्याच्या योजनांबद्दल विचारण्यात आलं. त्याने यावर एक मजेदार उत्तर दिलं. तो म्हणाला, ” मी आयपीएलसाठी खूप जुना झालो आहे. मी आता म्हातारा झालो आहे. आयपीएलची ऑफर आधी आली होती, पण मी त्यावेळी ती स्वीकारली नाही. आणि मला याबाबत कोणताही पश्चात्ताप नाही. मी खूप आनंदी आहे माझ्या निर्णयाबद्दल . ISPL सोबतच खूश आहोत. ती आमची स्टाईल आहे. टेनिस बॉल, गली क्रिकेट. IPL सारखी मोठी लीग आमच्यासाठी नाही. हीच लीग आमच्यासाठी खूप चांगली आहे.” असं म्हणत त्याने या ऑफरला स्पष्टपणे नकार दिला आहे.

Salman Khan Talk About IPL

“बॅटल ऑफ गलवान”कडून खूप अपेक्षा आहेत.

सलमानबद्दल बोलायचं झालं तर, तो शेवटचा रश्मिका मंदान्ना सोबत “सिकंदर” चित्रपटात दिसला होता. तो सध्या त्याच्या आगामी “बॅटल ऑफ गलवान” चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे, जो 2020 च्या भारत-चीन गलवान व्हॅली संघर्षावर आधारित आहे. सलमानचे मागील अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले आहेत, त्यामुळे चाहत्यांना आणि त्याला स्वतःला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

IPL मध्ये येणाऱ्या काळात काय होते हे पाहणे मनोरंजक

त्याच वेळी, आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर, खेळाडूंच्या ट्रेड विंडो हा चाहत्यांमध्ये बराच चर्चेचा विषय आहे. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन फ्रँचायझी सोडून दुसऱ्या संघात सामील होऊ शकतो. त्याला चेन्नई सुपर किंग्जमध्ये ट्रेड केले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे IPL मध्ये येणाऱ्या काळात काय होते हे पाहणे मनोरंजक नक्कीच असणार आहे.

गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.