
Salman Khan Personal Life: अभिनेता सलमान खान अद्यापही अविवाहित आहे. अभिनेत्याच्या आयुष्यात कधी प्रेमाची एन्ट्री झाली नाही असं नाही… अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींना सलमान खान याने डेट केलं आहे. पण अभिनेत्याचं नातं कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही. ज्या अभिनेत्रींनी सलमान खान याला डेट केलं आहे, त्यांनी काही वर्षांनंतर सलमानवर अनेक गंभीर आरोप केलं. त्या अभिनेत्री आज त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. पण सलमान खान मात्र आजही एकटा आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रसोबत सलमानचं लग्न देखील ठरलं होतं. पत्रिका देखील छापण्यात आलेल्या. पण अभिनेत्याचं लग्न मोडलं…
अनेकांना असं वाटतं की, सलमान खान याच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापण्यात आलेल्या… या फक्त चर्चा आहेत. पण एका कार्यक्रमात अभिनेत्री आणि सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानी हिने मोठा खुलासा केलेला. अनेक वर्ष संगीता आणि सलमान यांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केलं. दोघांचा नातं लग्नापर्यंत देखील पोहोचलं. दोघांच्या लग्नाचा पत्रिका देखील छापण्यात आलेल्या.
एका कार्यक्रमात संगिता बिजलानी हिला विचारण्यात आलं की, सलमानसोबत तुझ्या लग्नाची पत्रिका छापण्यात आली आहे का? ‘हा ते खोटं तर नाहीये… पण आता बस्स…, कपडे असे नाही घालायचे, इतके शॉर्ट कपडे नाही घालायचे. शॉर्ट कपडे नसले पाहिजे, कपडे लांब असले पाहिजे… ड्रेसचे गळे चांगले पाहिजे… मी अशाप्रकारचे कपडे घालू शकत नव्हते. सुरवातीला मी केलं, पण मला कहीही करण्याची परवानगी नव्हती. पण आता मी तशी राहिलेली नाही… आता मी पूर्ण गुंडी आहे.. आयुष्यातील तो भाग मी बदलला आहे म्हणून मी आनंदी आहे… असं देखील संगीता बिजलानी म्हणाली.
सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. पण सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी आणि खाजगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत देखील सलमानच्या रिलेशनशिपच्या चर्चा तुफान रंगल्या. दोघं लग्न करणार असं देखील चाहत्यांना वाटलं होतं.
पण असं काहीही झालं नाही. ऐश्वर्या हिने सलमान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केलं. एवढंच नाही तर, ऐश्वर्याच्या वडिलांनी पोलिसांत देखील तक्रार केली होती. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण त्यांच्या नात्याचा अंत देखील फार वाईट झाल.
आज ऐश्वर्या अभिनेता आणि पती अभिषेक बच्चन याच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण सलमान खान मात्र अद्यापही एकटाच आहे. वयाच्या 59 व्या वर्षी देखील सलमान एकटाच आयुष्य जगत आहे.