अभिनेत्रीसोबत फसवणूक, कुटुंबियांचा वाढला त्रास, पोलिसांकडे गेली पण…
TV Actress Puja Banerjee: अभिनेत्रीची मोठी फसवणूक, कुटुंबियांचा वाढला त्रास, कठीण प्रसंगी चिमुकल्याने साथ दिली, पण पोलिसांकडे गेल्यानंतर..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीने सांगितलेल्या घटनेची चर्चा...

TV Actress Puja Banerjee: झगमगत्या विश्वातील अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री पूजा बॅनर्जी आहे. पूजा सध्या आयुष्यात कठीण दिवसांचा सामना करत आहे. अभिनेत्रीची फसवणूक झाली आहे. ज्यामुळे पूजा हिच्या कुटुंबियांचा देखील त्रास वाढला आहे.
पूजा आणि पती कुणाल वर्मा यांच्यासोबत जवळपास 1.6 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. पूजा आणि कुणाल सध्या आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत. ज्याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीने एका मुलाखतीत केला आहे. सध्या सर्वत्र पूजा बॅनर्जी हिची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, पूजाचा पती कुणाल याने सांगितल्यानुसार, सध्या सेलिब्रिटी आर्थिक परिस्थिती सामना करत आहेत. अनेकांकडून दोघांनी पैसे घेतले आहेत आणि हळू – हळू प्रत्येकाचे पैसे परत करत आहेत. या कठीण प्रसंगी त्यांचा मुलगा त्यांच्या सोबत आहे… असं कुणाल म्हणाला.
मुलाबद्दल सांगताना पूजा म्हणाली, ‘माझ्या मुलाला आमच्या अडचणीबद्दल माहिती आहे. कारण घरात सतत पैशांबद्दलच चर्चा सुरु असते. माझ्या मुलाला श्याम सुंदर डे कोण आहे, हे सुद्धा माहिती नाही…’. मिळालेल्या माहितीनुसार, श्याम सुंदर डे याने अभिनेत्रीची फसवणूक केली आहे.
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मी एकदा घरी रडत होती. माझ्या मुलाला माहिती नव्हतं मी का रडत आहे. कारण आपण मुलांसमोर असं काहीही बोलत नाही… अशात तो अचानक म्हणाला, मम्मी श्याम दाला आपले पैसे आवडले असतील म्हणून त्याने आपले पैसे घेतले.’
‘त्याने आपले पैसे घेतले, पण देवबाप्पा तुला खूप पैसे देईल… माझा मुलगा असं म्हटल्यानंतर मी त्याला मिठी मारली, त्याला जवळ घेतलं. तो जे काही बोलला ते माझ्या हृदयापर्यंत पोहोचलं. कुटुंबातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून माझा मुलगा कायम देवाकडे प्रार्थना करत असतो… तो देवाला म्हणतो, माझ्या आई – वडिलांचे पैसे लवकरात लवकर परत कर आणि सर्वकाही लवकर ठिक होऊ दे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
2025 मध्ये पूजा आणि कुणाल यांनी सांगितलं होतं, त्यांची जवळपास 1.6 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. निर्माता श्याम सुंदर डे याच्यासोबत पूजा आणि कुणाल यांनी ओटीटी सिनेमे साईन केले होते. ज्यासाठी पूजा आणि कुणार यांना 50 लाख रुपयांचा नफा होईल असं सांगण्यात आलं होतं.
पण ठरल्यानुसार, पूजा आणि कुणाल यांनी निर्मात्याने पैसे दिले नाहीत. अखेर पूजा हिने श्याम सुंदर डे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पण निर्मात्याच्या पत्नीने पूजा आणि कुणाल यांच्याविरोधात तक्रार दाखल करत अपहरण आणि फसवणुकीचे आरोप केले.
