सलमान खानच्या एक्स-गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा, ‘रिलेशनशिपमध्ये असल्याचा नुसता देखावा…’

Salman Khan Ex-Girlfriend: 'रिलेशनशिपमध्ये असल्याचा नुसता देखावा...' अनेक वर्षांनंतर असं का म्हणाली सलमान खान याची एक्स-गर्लफ्रेंड? चर्चांना उधाण, अभिनेता सलमान खान कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे असतो चर्चेत...

सलमान खानच्या एक्स-गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा, रिलेशनशिपमध्ये असल्याचा नुसता देखावा...
| Updated on: Aug 26, 2024 | 11:20 AM

अभिनेता सलमान खान याने अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले आहेत. आजपर्यंत इंडस्ट्री सलमान खान याची जागा कोणताच अभिनेता घेऊ शकलेला नाही. सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर, चर्चेत असतोच. पण अभिनेता खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत असते. दरम्यान, सलमान खान याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली ‘बिग बॉस 18’ शोमध्ये स्पर्धक म्हणून येणार अशी चर्चा रंगली होती. यावर खद्द अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोमी हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोमी अली ‘बिग बॉस 18’ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे… अशा चर्चांनी जोर धरला होता. निर्मात्यांनी सोमी हिला शोसाठी अप्रोच केल्याची माहिती देखील समोर आली. यावर आता सोमी हिची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. सोमी हिने रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा आहेत… शोची रेटिंग वाढवण्यासाठी असं डाव रचले जात आहेत… असं देखील अभिनेत्री म्हणाली.

 

 

नुकताच झालेल्या मुलाखतीत सोमी म्हणाली, ‘ज्या शोचा कालावधी अधिक काळ असेल असा शोमध्ये मला सहभागी व्हायला आवडणार नाही. मी शोचा आदर करते. पण मी कधीच शोचा एकही एपिसोड पाहिलेला नाही. शो कसा असतो मला माहिती नाही…’ असं सोनी म्हणाली.

अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘माझ्या महितीनुसार, शो पूर्णपणे स्क्रिप्टेड आहे. मला अशा शोमध्ये सहभागी व्हायला आवडेल जो स्क्रिप्टेड नाही… जर मला बिग बॉसमध्ये बोलावलं तर मी जाणार नाही… निर्माते शोची रेटिंग वाढण्यासाठी डाव आखत आहे. पण मी स्क्रिप्टेट शोमध्ये जाणार नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

‘मला सांगण्यात आलं होतं की, एका अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा देखावा कर.. असं 90 च्या दशकात सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सांगितलं जायचं… त्यामुळे माझ्याबद्दल आता रंगणाऱ्या चर्चा नव्या नाहीत…’ असं देखील अभिनेत्री म्हणली.

सलमान खान आणि सोमी अली

सलमान खान आणि सोमी अली यांचं नातं एकेकाळी तुफान चर्चेत होतं. दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल व्हायचे. पण अभिनेत्री ऐश्वर्या राय हिचे सलमानच्या आयुष्यात एन्ट्री झाल्यानंतर सोमी – सलमान यांचं ब्रेकअप झालं. सलमान – सोमी यांच्या घटस्फोटाला अनेक वर्ष झाली आहेत. पण तरी देखील दोघांच्या नात्याची चर्चा कायम रंगलेली असते.