AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने चाहत्याला दिला धक्का; व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. 'गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची भीती असेल' असं एकाने लिहिलंय. तर 'अशा लोकांना इतका भाव का देता', असा सवाल दुसऱ्या युजरने केला.

Salman Khan | सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने चाहत्याला दिला धक्का; व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Salman KhanImage Credit source: Twitter
| Updated on: Apr 27, 2023 | 3:20 PM
Share

मुंबई : अभिनेता सलमान खान बुधवारी मुंबई विमानतळावर पोहोचला. दुबईत ईद साजरी केल्यानंतर तो मुंबईत परतला होता. यावेळी एअरपोर्टवर सलमानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सलमानच्या आजूबाजूला चाहत्यांचा गराडा पहायला मिळत आहे. गर्दीत अनेक चाहते सलमानशी हात मिळवण्याचा प्रयत्न करतात. वारंवार नकार दिल्यानंतरही एक चाहता सलमानसमोर हात पुढे करतो, तेव्हा त्याच्या बाजूला असलेला बॉडीगार्ड शेरा त्या चाहत्याला धक्का देतो. शेरा आणि सलमानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची भीती असेल’ असं एकाने लिहिलंय. तर ‘अशा लोकांना इतका भाव का देता’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘चाहत्याला दिलेली ही किती वाईट वागणूक आहे’, असंही एका नेटकऱ्याने म्हटलंय. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमानला आता वाय प्लस दर्जाची सुरक्षा आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने बुलेटप्रूफ कारसुद्धा खरेदी केली होती.

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

शेरा हा सलमानचा अत्यंत जवळचा बॉडीगार्ड आहे. तो स्वत: कोणत्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. सलमान आणि शेराची पहिली भेट ही गायक व्हिगफिल्डच्या शोमध्ये झाली होती. त्यानंतर 1995 मध्ये सलमान केनू रिव्ह्सच्या पार्टीत पुन्हा एकदा शेराला भेटला होता. तिथे सोहैल खानने शेराला सलमानचा बॉडीगार्ड होण्याची मागणी केली होती. 1998 मध्ये शेराने सलमानच्या चंदीगडमधल्या शोसाठी पहिल्यांदा बॉडीगार्ड म्हणून काम केलं होतं. तेव्हापासून तो सलमानच्या सेवेत कायम रूजू आहे.

एका मुलाखतीत शेरा म्हणाला होता की सलमान मालिक त्याच्यासाठी सर्वकाही आहे. “मी त्यांच्यासाठी माझा जीवसुद्धा देऊ शकतो. तो माझा देव आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी भाईसोबतच राहीन”, असं तो म्हणाला. सलमान शेराचा मुलगा अभीरला बॉलिवूडमध्ये लाँच करणार असल्याचंही म्हटलं जातंय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?