Salim Khan Health: सलीम खान व्हेंटिलेटरवर… प्रकृतीबद्दल डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट

Salim Khan Health: अभिनेता सलीम खान यांना मंगळवारी रुग्णालयात देखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. सध्या सलीम खान रुग्णालयात असून, डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल मोठी माहिती दिली आहे.

Salim Khan Health: सलीम खान व्हेंटिलेटरवर... प्रकृतीबद्दल डॉक्टरांकडून महत्त्वाची अपडेट
सलीम खान
| Updated on: Feb 18, 2026 | 12:27 PM

Salim Khan Health: अभिनेता सलमान खान याचे वडील आणि दिग्गज लेखक सलीम खान यांना मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. न्‍यूरोलॉजिस्‍ट, कार्डियोलॉजिस्‍ट, न्‍यूरोसर्जन आणि क्रिटिकल एक्‍सपर्ट यांच्यासह स्पेशलिस्टची संपूर्ण टीम सलीम खान यांच्यावर लक्ष ठेवून आहे. रुग्णालयात सलीम खान यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी अनेक सेलिब्रिटी लीलावती रुग्णालायत येत आहेत. मंगळवारी रात्री 11 वाजता सलमान खान, अरबाज खान, सून शूरा खान यांच्या सह लेक अर्पिता खान, अलविरा खान, नातू निर्वाण, अरहान आणि जावेद अख्तर, झिशान सिद्दकी देखील रुग्णालयात पोहोचले होते… सलीम खान यांच्या दोन पत्नी सलमा खान आणि हेलन देखील लीलावती रुग्णालयात पोहोचल्या होत्या…

सलमान खानचे वडील आणि ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांची शस्त्रक्रिया झाली आहे आणि ते व्हेंटिलेटरवर आहेत.. अशी माहिती लीलावती रुग्णालयातील डॉक्टर जलील पाटकर यांनी दिली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे आणि त्यांना आता व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे…’, सांगायचं झालं तर, त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याची देखील माहिती समोर आली होती.

 

 

सलीम खान यांच्यावर लिलावतीचे प्रसिद्ध डॉक्टर जलील पारकर यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरु आहेत. मेडिकल टीममध्ये न्यूरोलॉजिस्ट डॉ.नितीन डांगे आणि डॉ.बिनीत आहलुवालिया यांचा देखील समावेश आहे. सलीम खान रुग्णालयात असल्याममुळे कुटुंबिय देखील चिंतेत आहेत.

सध्या ICU मध्ये असलेल्या सलीम खान यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी जुने मित्र जावेद अख्तर बुधवारी सकाळी 10.30 वाजता लीलावती रुग्णालयात पोहोचले होते. मंगळवारी देखील जावेद अख्तर रुग्णालयात पोहोचले होते. सांगायचं झालं तर, 70 – 80 च्या दशकात जावेद अख्तर आणि सलीम खान यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं… ‘जंजीर’, ‘शोले’, ‘दीवार’, ‘डॉन’, आणि ‘मिस्‍टर इंडिया’ यांसारखे सिनेमे त्यांनी बॉलिवूडला दिले आहेत. अशात मित्र कठीण काळात असल्यामुळे जावेद अख्तर त्यांच्यासोबत आहेत.