AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan | १४ वेळा अभिनेत्रीची प्रेग्नेंसी फेल, सलमान खान याने दिलेल्या एका सल्ल्यामुळे झाली आई

सलमान खान याने दिलेला सल्ला अभिनेत्रीसाठी ठरला लाभदायक... 'ही' अभिनेत्री २०१७ साली झाली जुळ्या मुलांची आई... सध्या सर्वत्र भाईजान याचीच चर्चा...

Salman Khan | १४ वेळा अभिनेत्रीची प्रेग्नेंसी फेल, सलमान खान याने दिलेल्या एका सल्ल्यामुळे झाली आई
| Updated on: May 11, 2023 | 12:39 PM
Share

मुंबई : अभिनेता सलमान खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. सलमान याची बॉलिवूडमध्ये एक खास ओळख आहे. आतापर्यंत सलमान खान याने अनेकांना बॉलिवूडमध्ये संधी आहे तर, अनेकांना महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. अनेक सेलिब्रिटी सलमान खान याच्याबद्दल अनेक गोष्टी सांगत असतात. एका अभिनेत्रीने देखील मुलाखतीत सलमान खान याने दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितलं आहे. ज्यामुळे अभिनेत्री आई होवू शकली. एक दोन नाही तर, १४ वेळा प्रेग्नेंसी फेल झाल्यानंतर सलमान खान याने दिलेल्या सल्ल्यानंतर अभिनेत्री आई झाली… ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री कश्मीरा शाह आहे.. कश्मिरा तिच्या सिनेमांमुळे नाही तर कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

कश्मिरा आणि कृष्णा यांच्या नात्याला २०१५ साली सुरुवात झाली. दोघांच्या नात्याची चर्चा देखील तुफान रंगली. कृष्णा हिच्यासोबत कश्मिरा हिचं दुसरं लग्न आहे… दोघांच्या नात्याची सुरुवात ‘पप्पू पास हो गया’ सिनेमाच्या सेटवर सुरु झाली. शुटिंगनंतर देखील दोघे एकमेकांसोबत वेळ व्यतीत करु लागले. पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर अभिनेत्रीने कृष्णा याच्यासोबत दुसरं लग्न केलं.

लग्नानंतर एक छोटं बाळ असावं अशी इच्छा प्रत्येक जोडप्याची असते. नैसर्गिकरित्या गर्भवती होऊ शकत नसल्यामुळे कश्मिरा आणि कृष्णा यांनी आयव्हीएफची देखील मदत घेतली. पण तर एका मुलाखतीत कश्मिराने सांगितलं होतं की, तिने प्रेग्नंट राहण्यासाठी 14 वेळा प्रयत्न केले. पण १४ वेळा तिचे प्रयत्न फेल ठरले… त्यानंतर सलमान खान याने दिलेल्या सल्ल्यामुळे कश्मिरा जुळ्या मुलांची आई झाली…

सलमान खान याने कश्मिरा आणि कृष्णा यांना सरोगेसीच्या मदतीने आई – बाबा होण्याचा सल्ला दिला. सलमान सल्ला ऐकल्यानंतर कश्मिरा आणि कृष्णा २०१७ साली जुळ्या मुलांचे आई – बाबा झाले… आज दोघे त्यांच्या चिमुकल्यांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. कश्मिरा कायम तिच्या मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

गेल्या काही दिवसांपासून कश्मिरा झगमगत्या विश्वापासून दूर आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?