Faraaz Khan | राणीच्या ‘हिरो’ला सलमानची मदत, फराज खानच्या उपचारांना सुरुवात!

ब्रेन इन्फेक्शन आणि न्युमोनियाशी झुंज देणाऱ्या या अभिनेत्याची आर्थिक स्थिती हालाखीची असल्यामुळे त्याच्या उपचारात खंड पडला होता.

Faraaz Khan | राणीच्या ‘हिरो’ला सलमानची मदत, फराज खानच्या उपचारांना सुरुवात!

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जीसह सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता फराज खान (Faraaz Khan) सध्या प्रचंड आजारी आहे. बंगळूरच्या एका खाजगी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आहे आहे. ब्रेन इन्फेक्शन आणि न्युमोनियाशी झुंज देणाऱ्या या अभिनेत्याची आर्थिक स्थिती हालाखीची असल्यामुळे त्याच्या उपचारात खंड पडला होता. अभिनेत्री पूजा भट्टनी या संदर्भात ट्विट करत, फराजच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. आता, सलमान खानने फराजच्या संपूर्ण उपचारांची जबाबदारी घेतल्याचे कळते आहे. (Salman Khan Helped actor Faraaz Khan for medical treatment)

सलमान खानसह ‘दुल्हन हम ले जाएंगे’, ‘कही प्यार ना हो जाए’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री कश्मीरा शाहने याबद्दल माहिती दिली आहे. सलमानने फराजच्या उपचारांचा सगळा खर्च केल्याचे या अभिनेत्रीने पोस्ट करत सांगितले आहे.

सलमान खानकडून मदतीचा हात

फराज खानच्या कुटुंबाने त्याच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. पूजा भट्टनेही पोस्ट करत मदतीची मागणी केली होती. ज्यानंतर सलमान खानने कुठलाही गाजावाजा न करता रुग्णालयाचे संपूर्ण बिल भरले आहे (Salman Khan Help Faraaz). कश्मीराने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीत म्हटले की, ‘तुम्ही खरंच एक चांगली व्यक्ती आहात. फराज आणि त्याच्या उपचारांच्या बिलाची काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. ‘फरेब’ आणि ‘गेम’सारख्या चित्रपटात झळकलेला अभिनेता फराज खानची स्थिती सध्या नाजूक आहे. सलमान खान त्याच्या मदतीसाठी धावून आला आहे. तो नेहमीच सगळ्यांची मदत करतो. मी त्याची खूप मोठी चाहती आहे आणि कायम राहीन. जर यामुळे तुम्ही माझा राग करणार असाल तर, तुमच्याकडे अनफॉलोचा पर्याय आहे. सलमान या इंडस्ट्रीतला सगळ्यात सच्चा माणूस आहे.’ (Salman Khan Helped actor Faraaz Khan for medical treatment)

सलमान खानच्या याच वृत्तीमुळे तो चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. सलमान खानच्या या मदतीनंतर, सोशल मीडियावरून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फराज गेल्या पाच दिवसांपासून बंगळूरमधील खाजगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल आहे. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरमुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. उपचारासाठी 25 लाख रुपयांची गरज असल्याची माहिती फराज खानचा भाऊ फहमान खान यांनी दिली आहे.

पूजा भट्टकडून मदतीचे आवाहन

फराज खान हा बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक युसूफ खानचा मुलगा आहे. फराजबद्दल माहिती मिळताच पूजा भट्टने देखील मदतीसाठी आवाहन केले होते.

(Salman Khan Helped actor Faraaz Khan for medical treatment)

Published On - 12:21 pm, Thu, 15 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI