Salman Khan : सलमान खानचा नवा लूक पाहून उंचावल्या अनेकांच्या भुवया, हैराण युजर्स म्हणाले, ‘काही तरी मोठं…’

Salman Khan : 'काही तरी मोठं...', सलमान खानचा नवा लूक पाहिल्यानंतर उंचावल्या अनेकांच्या भुवया, चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या नव्या लूकची चर्चा...

Salman Khan : सलमान खानचा नवा लूक पाहून उंचावल्या अनेकांच्या भुवया, हैराण युजर्स म्हणाले, काही तरी मोठं...
अभिनेता सलमान खान
| Updated on: Jun 14, 2026 | 8:00 AM

Salman Khan : फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी देखील तेव्हा हैराण झाले, जेव्हा अनेकांनी सलमान खान याला नव्या लूकमध्ये पाहिलं. सलमान खान याने जेव्हा आनिर खान याच्या एका कार्यक्रमात प्रवेश केला तेव्हा सलमान याला पाहून आमिर देखील थक्क झाला. सांगायचं झालं तर, आमिर खान स्टारर ‘लगान’ सिनेमाला 12 जून रोजी 25 वर्ष पूर्ण झाली, याच निमित्ताने आमिर खान याने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. कार्यक्रमासाठी सलमान, करीना कपूर यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली, पण सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या नव्या लूकची चर्चा रंगली होती. आमिर खान आणि करीना कपूर देखील सलमान याच्याकडे पाहातच राहिली. सलमान खान याला नव्या लूकमध्ये पाहिल्यानंतर चाहत्यांनी ‘तेरे नाम’ सिनेमातील राधे… लूकची आठवण झाली.

सलमान खान याने त्याचे केस प्रचंड बारीक केले आहे… इतके लहान की, नव्या लूकमध्ये अभिनेता बाल्ड दिसत आहे. चेहऱ्यावर हलकी दाढी आणि अत्यंत प्रभावी शरीरयष्टी असलेल्या या लूकमुळे सर्वांनाच प्रश्न पडला आहे की, सलमान खान याने हा लूक नक्की कोणत्या सिनेमासाठी आहे? काहींनी तर हा लूक ‘तेरे नाम 2’ साठी असावा, असा अंदाजही वर्तवायला सुरुवात केली आहे. दरम्यान, सलमानला या अवतारात पाहून अनेकांना ‘तेरे नाम’ मधील ‘राधे’ या भूमिकेची आठवण झाली; ही तिच भूमिका आहे जी अखेरीस मनोरुग्णालयात पोहोचते.

सध्या इन्स्टाग्रामवर सलमान खान याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सलमान खान याचा नवा लूक पाहिल्यानंतर चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘भाई लूक बदलला आहेस, काही तरी मोठं होणार आहे…’. दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काही तरी शिजत आहे. इतका फिट आणि गुडलुकींग सलमान…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘विश्वास बसत नाही की, भाईजान तू हटके दिसत आहेस.’, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या नव्या लूकची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्याचा नवीन लूक आवडला आहे.

सलमानचा नवीन लूक पाहिल्यानंतर चाहत्यांनी तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. हा लूक ‘तेरे नाम’ किंवा ‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलसाठी आहे की एखाद्या आगामी ॲक्शन सिनेमासाठी. काहींच्या मते, सलमान ‘अल्फा’ (Alpha) या सिनेमात एका छोट्या भूमिकेत दिसणार असून, हा लूक त्याच भूमिकेसाठी आहे. दरम्यान, सलमान लवकरच दिल राजू यांच्या निर्मितीखालील एका ॲक्शन सिनेमात दिसणार आहे; या सिनेमाचं शीर्षक अद्याप निश्चित झालेलं नसलं तरी सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. या सिनेमात नयनताराही सलमान खान याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

 

Follow Us