माझ्या फक्त 3 – 4 गर्लफ्रेंड्स…, लव्हलाईफबद्दल सलमान खानचा मोठा खुलासा
Salman Khan on Love Life: 'माझ्या फक्त 3 - 4 गर्लफ्रेंड्स...', सलमान खान कायम लव्हलाईफमुळे असतो चर्चेच, आता देखील भाईजानने केलाय मोठा खुलासा..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याची चर्चा...

Salman Khan on Love Life: अभिनेता सलमान खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आतापर्यंत सलमान खान याने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सलमान खानचे फ्लॉप झाले तरी देखील त्याच्या चाहत्यांची संख्या कमी झाली नाही. आज फक्त भारतात नाही तर, साता समुद्रापार देखील सलमान खानच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सलमान त्याच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असतो.
नुकताच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 3’ मध्ये सलमान खान पोहोचला आणि अभिनेत्याने स्वतःच्या लव्हलाईफबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘गर्लफ्रेंड्सच्या प्रकरणात सलमान खान प्रचंड लकी आहे?’ असं कपिल शर्मा म्हणाला. यावर सलमान खान याने देखील उत्तर दिलं.
सलमान खान म्हणाला, ‘हे बिलकूल सत्य नाही… जर तुम्ही पाहिलं तर मी 59 वर्षांचा आहे आणि माझ्या फक्त 3 – 4 गर्लफ्रेंड राहिल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे लोकं कशा प्रकारे एक नातं मोडल्यानंतर दुसऱ्या नात्यात उडी मारतात. या तुलनेक मी जुन्या विचारांचा आहे…’ असं देखील सलमान खान म्हणाला.
सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने आतापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना डेट केलं आहे. संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, यूलिया वंतूर अनेक अभिनेत्रींसोबत सलमान खान याच्या नावाची चर्चा रंगली. पण कोणत्यात अभिनेत्रीसोबत सलमान खान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत तर सलमान खान याच्या नात्याची चर्चा आजही रंगलेली असते. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. चाहत्यांनी दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं होतं. पण ऐश्वर्याने सलमान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप करत ब्रेकअप केलं.
सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप केल्यानंतर ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या लेक आराध्या हिला जन्म दिला.
