अभिषेकसोबत साखरपुडा मोडताच करिश्माला बसलेला मोठा धक्का, नाही मिळालं वैवाहिक आयुष्याचं सुख
Karisma Kapoor Personal Life: अभिषेकसोबत मोडला साखरपुडा, पूर्व पतीने केली फसवणूक... करिश्माच्या नाही मिळालं वैवाहिक आयुष्याचं सुख, म्हणाली, 'जे काही झालं त्यासोबत तडजोड केली आणि...', अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याच्या कायम रंगलेल्या असतात चर्चा...

Karisma Kapoor Personal Life: अभिनेत्री करिश्मा कपूर हिने खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केलं. अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत साखरपुडा मोडल्यानंतर अभिनेत्रीने उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर करिश्मा आणि संजय यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. करिश्मा आणि संजय यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर करिश्मा आणि अभिषेक यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
बच्चन कुटुंबियांची भावी सून म्हणून देखील बच्चन कुटुंबियांनी घोषणा केली होती. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. साखरपुडा मोडल्यानंतर करिश्माला मोठा धक्का बसला. याबद्दल अभिनेत्रीने भावना देखील व्यक्त केल्या होत्या. साखरपुडा मोडल्यानंतर अत्यंत वाईट अनुभव असल्याचं करिश्माने सांगितलं होतं.
अभिनेत्री म्हणाली होती, ‘यंदाच्या वर्षाची सुरुवात माझ्यासाठी वाईट होती. मी जे काही सहन केलं आहे, ते दुसऱ्या कोणत्याच मुलीच्या नशिबी नको. मला माझ्या दुःखाचा सामना स्वतःच करावा लागला. मला वाटलं वेळेनुसार सर्वकाही ठिक होईल. मी खूप काही सहन केलं आहे. माझ्यासोबत जे काही झालं आहे, त्यासोबत मी आता तडजोड केली आहे. फक्त एवढंच बोलेल की जे नशिबात लिहिलेलं आहे ते होणारच… पण मी तेव्हा सर्वकाही सहन करण्यासाठी भावनात्मकरित्या तयार नव्हती.
त्या कठीण काळात माझ्यासोबत कोणीच नव्हतं….कठीण काळात माझे आई – वडील, बहीण, आजी कुटुंबिय जवळचे मित्र माझ्यासोबत नसते तर मी कधीच स्वतःला सावरु शकली नसती… दुःखावर मात करु शकली नसते. आयुष्य कायम तुम्हाला वेगवेगळे कार्ड देत असते. तुम्हाला त्यानुसार जगायचं असतं’ असं देखील करिश्मा म्हणाली.
काय म्हणाले होते महानायक अमिताभ बच्चन
दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनी करिश्मा आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ‘तो एक संवेदनशील क्षण होता. नाती तयार होतात, नाती तुटतात. हे कोणत्याही तरुणासाठी आणि अर्थातच कुटुंबासाठीही दुःखद असू शकतं. आम्हाला असं कोणासोबतही घडू द्यायचं नव्हतं, परंतु जर परिस्थिती एकत्र येण्यासाठी अनुकूल नसेल, तर वेगळं होणें चांगलं आणि तेच घडलं.’ असं बिग बी म्हणाले होते.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय
अभिषेक बच्चन यांचं नाव देखील अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी देखील बराच काळ एकमेकांना डेट केलं त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या लेक आराध्या हिला जन्म दिला.
