
सलमान खानचे बॉलिवूडमध्ये असे फार कमी मित्र आहेत ज्यांच्याबद्दल तो कायमच भरभरून बोलताना दिसतो. त्यातीलच एक आहे अभिनेता गोविंदा. सलमानने त्याच्या अनेक मुलाखतींमध्ये गोविंदाचे कौतुक केले आहे. एकदा त्याने असेही म्हटले होते की त्याला गोविंदासारखा अभिनेता व्हायचे आहे. तसेच एकदा सलमानने गोविंदाबद्दलची अशी एक गोष्ट सांगितली, त्याचा सलमानवर फार परिणाम करून गेली. आणि आयुष्यभर गोविंदाने सांगितलेली ती एक गोष्ट तो कधीच विसरला नाही. आजही सलमान गोविंदाची ती गोष्ट आयुष्यात पाळतो.
सलमान खानच्या मनात गोविंदाबद्दल खूप आदर
गोविंदा आणि सलमान खान यांनी 1980 च्या दशकात त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. गोविंदाचे चित्रपट प्रथम आले आणि काही वर्षांतच तो इंडस्ट्रीचा सर्वात मागणी असलेला हिरो बनला. दिलीप कुमार सारख्या दिग्गज अभिनेत्यांसह त्याला चित्रपट मिळू लागले. तो एकामागून एक चित्रपट साइन करत होता. दरम्यान त्याचवेळी सलमान खानही बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होता. पण दोघांमध्ये स्पर्धेची भावना नव्हती. याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा सलमान संघर्ष करत होता, तेव्हा त्याने गोविंदाचा स्टार होता. तसेच सलमान खान तेव्हापासूनच गोविंदाला खूप मानत होता.
सलमान आणि गोविंदाने 90 च्या दशकात अनेक उत्तम चित्रपट दिले
तसेच सलमान खान गोविंदाला नेहमीच आपला मोठा भाऊ मानत आला आहे. आणि तो त्याचपद्धतीने त्याच्याशी वागतो. त्याचा आदर करतो. पण एकदा एका छोट्याशा घटनेने सलमान बदलला. आणि गोविंदाने सांगितलेली एक गोष्ट त्याच्या मनाला भिडली.
सलमान खानच्या मनाला भीडलेली ती गोष्ट
एकदा बिग बॉस 16 च्या एका एपिसोड दरम्यान,सलमान खानने हा किस्सा सांगितला होता. स्पर्धकांना समजावून सांगितला होता. एकदा तो आणि गोविंदा एका कारने कुठेतरी जात होते. तेव्हा दुसऱ्या कारने त्यांना ओव्हरटेक केले आणि गोविंदाला आईवरून शिवी दिली. सलमानने सांगितले की गोविंदाने त्याच्या ड्रायव्हरला त्या गाडीचा पाठलाग करण्यास सांगितले आणि शेवटी जेव्हा तो त्या गाडीजवळ पोहोचला तेव्हा गोविंदाने त्याच्या गाडीतून खाली उतरून त्याला फक्त एकच उत्तर दिले ‘मेरी माँ वो तेरी माँ जैसीही है’. गोविंदाने ज्या संयमाने त्या व्यक्तीला उत्तर दिलं ते पाहून सलमान खानही शॉक झाला. सलमान म्हणाला गोविंदाची ही गोष्ट तो कधीही विसरला नाही. आजही तो ही गोष्ट पाळतो.