AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Khan: वयाच्या 60 व्या वर्षी सलमानने कमी केलं इतकं वजन; पाहून सोहैलसुद्धा थक्क!

Salman Khan: भाऊ सोहैल खानला पाठिंबा देण्यासाठी अभिनेता सलमान खान नुकताच 'अलायन्स' या शोमध्ये पोहोचला. या शोचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत असून सलमानने त्यात वजन कमी केल्याचा खुलासा केला आहे.

Salman Khan: वयाच्या 60 व्या वर्षी सलमानने कमी केलं इतकं वजन; पाहून सोहैलसुद्धा थक्क!
Salman Khan and Sohail KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 03, 2026 | 3:48 PM
Share

आपल्या फिटनेससाठी ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान विविध प्रोजेक्ट्समधील भूमिकेनुसार त्याच्या लूकमध्ये सतत बदल करताना दिसतो. ‘सुलतान’सारख्या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने बरंच वजन वाढवलं होतं. तर आता आगामी ‘SVC 63’ या चित्रपटासाठी त्याने चार-पाच किलो नाही तर तब्बल 16 किलो वजन कमी केलं आहे. काही दिवसांपूर्वीच सलमानने जिममधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर आता ‘अलायन्स’ या शोमध्ये त्याने भाऊ सोहैल खानसमोर वजन कमी केल्याचा खुलासा केला आहे. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘अलायन्स’ या शोमध्ये सलमानने एण्ट्री केली आहे. या शोमध्ये सोहैल खान स्पर्धक असून त्यालाच पाठिंबा देण्यासाठी सलमान तिथे पोहोचला आहे.

सलमानने ‘अलायन्स’मध्ये एण्ट्री करताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. या एपिसोडचे प्रोमो व्हायरल होत आहेत. त्यातील एका प्रोमोमध्ये सलमान सोहैलची मस्करी करत त्याला म्हणतो, “तुझं वजन कमी झालेलं दिसतंय.” तेव्हा सोहैल त्याला सिक्स पॅक अॅब्स दाखवतो आणि म्हणतो, “बारा किलो”. तेव्हा सलमान त्याला सांगतो, “मी तर 16 किलो वजन कमी केलं आहे.” हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

पहा व्हिडीओ-

सलमान त्याच्या आगामी ‘SVC 63’ या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. वामशी पेडिपल्ली दिग्दर्शित या चित्रपटासाठीच त्याने वजन कमी केल्याचं म्हटलं जात आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात त्याच्यासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधील सलमानची अवस्था पाहून चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यात सलमान खूपच आजारी आणि थकलेला दिसत होता. आपल्या फिटनेस आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वासाठी ओळखला जाणारा सलमान यात खूपच खंगलेला दिसला होता. सोशल मीडियावर अनेकांनी सलमानच्या प्रकृतीबद्दल काळजी व्यक्त केली होती. त्यानंतरच सलमानने जिममधील फोटो पोस्ट करत ‘तुमची तब्येत कशी आहे’, असा सवाल चाहत्यांना केला होता.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी