शाहरुख-सलमानचा मृत्यू एकाच वर्षी होणार? ‘भाईजान’ला गंभीर आजार, त्या भविष्यवाणीची का होतेय चर्चा?
एका ज्योतिषाने बॉलिवूडचा 'किंग' अर्थात अभिनेता शाहरुख खान आणि बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खान यांच्याबद्दल धक्कादायक भविष्यवाणी केली होती. ही भविष्यवाणी ऐकून तुम्हीसुद्धा हैराण व्हाल!

एका प्रसिद्ध ज्योतिषाने शाहरुख खान आणि सलमान खानबद्दल खळबळजनक भविष्य वर्तवलं आहे. या दोघांच्या आयुष्याबद्दल त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. या ज्योतिषाने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की सध्या शाहरुखचा काळ चांगला आहे. पण सलमानसाठी वाईट काळ आहे. 2025, 2026 आणि 2027 हे तीन सलग वर्ष सलमानसाठी सतत वाईट असतील, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. त्याचप्रमाणे या दोघांमध्ये एक गोष्ट समान असल्याचंही त्यांनी म्हटलंय. “सलमान लवकरच एका भयानक आजाराने ग्रस्त होईल. मी या आजाराचं नाव उघड करणार नाही. पण हा एक असाध्य आजार आहे”, असं भविष्य त्यांनी वर्तवलं आहे.
तर दुसरीकडे सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या मृत्यूविषयीही ज्योतिषाने भाकित वर्तवलं आहे. हो दोघं एकाच वर्षी या जगाचा निरोप घेतली, असं त्यांनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर त्यांनी दोघांचं कोणत्या वयात निधन होईल, हेसुद्धा सांगितलं आहे. या ज्योतिषाच्या मते वयाच्या 67 व्या वर्षी हे दोघं अखेरचा श्वास घेतील. सलमान आणि शाहरुख एकाच वयाचे आहेत. हे दोघंही आता 59 वर्षांचे आहेत. दोघांचा जन्म एकाच वर्षी झाला होता. शाहरुखचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी तर सलमानचा जन्म 27 डिसेंबर 1965 रोजी झाला होता.
संबंधित ज्योतिषाचा पॉडकास्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. ‘एक चांगला ज्योतिषी कधीच मृत्यूची भविष्यवाणी करत नाही’, असं एकाने म्हटलंय. तर ‘ज्योतिषांचा पहिला नियम म्हणजे मृत्यूची भविष्यवाणी न करणे’, असं दुसऱ्याने लिहिलंय. अनेकांना त्यांचं हे म्हणणं पटलं नाही.
विशेष म्हणजे या पॉडकास्टमध्ये ज्योतिषाने सलमानच्या आजाराचा उल्लेख केला होता. याच दरम्यान सलमानने कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये त्याच्या आरोग्याच्या समस्येविषयी खुलासा केला आहे. 59 वर्षीय सलमानने खुलासा केला तो ब्रेन एन्युरिझम नावाच्या मेंदूच्या आजाराने, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया नावाच्या चेहऱ्याच्या आराजाने आणि आर्टेरिओव्हेनस मॅलफॉर्मेशन (AVM) नावाच्या धमन्यांच्या विकाराने ग्रस्त आहे. सलमानच्या फिटनेसकडे पाहून तो इतक्या आजारांनी ग्रस्त असल्याचं वाटत नाही. परंतु या आजारांना अगदीच किरकोळ मानणंही चुकीचं ठरेलं. विशेषकरून AVM जे मेंदूमध्ये असल्यास खूप धोकादायक असू शकतं. त्यामुळे ज्योतिषाने वर्तवलेलं हे भविष्य सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आलं आहे.
