AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय दत्त त्याच्या मुलांचा बाबा आणि माझा…, सलमान खानच्या एका पोस्टने चर्चांना उधाण

अभिनेता सलमान खान याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. भाईजानने अभिनेता संजय दत्त याच्यासोबत दोन फोटो पोस्ट करत खास कॅप्शन लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

संजय दत्त त्याच्या मुलांचा बाबा आणि माझा..., सलमान खानच्या एका पोस्टने चर्चांना उधाण
सलमान खान - संजय दत्त
| Updated on: Aug 01, 2026 | 8:05 AM
Share

अभिनेता सलमान खान आणि अभिनेता संजय दत्त यांच्या मैत्रीबद्दल आज सर्वांना माहिती आहे. कोणत्याही मुलाखती सलमान आणि संजूबाबा एकमेकांबद्दल सांगत असतात. आता सलमान याने संजय याच्यासोबत सोशल मीडियावर काही  फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये दोघांची मैत्री इतक्या वर्षांनंतर देखील किती घट्ट आहे, हे दिसून येत आहे. फोटोमध्ये दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली आहे. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांना आनंद तर झालाच आहे. पण  सलमान खान याने संजूबाबासाठी लिहिलेलं कॅप्शन सध्या सर्वत्र चर्चेत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सलमान खान याने शेअर केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

संजय दत्त याच्यासोबत फोटो पोस्ट करत सलमान खान याने कॅप्शनच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केलं आहे. सलमान याने शायराना अंदाजात संजूबाबावर असलेल प्रेमं व्यक्त केलं आहे. सलमान खान कॅप्शनमध्ये म्हणतो, ‘बाबा फॉरेएव्हर बाबा… बाबा तर अखेर बाबा असतो… संजूबाबा आपल्या सर्वांचा बाबा आणि संजूबाबा त्याच्या मुलांचा बाबा… माझा मोठा भाऊ संजय दत्त… अल्लाह, भगवान, जीसस  सर्व या माणसाला आनंदी ठेवा… आय लव्ह यू बाबा…’, सध्य सलमान खान याच्या पोस्टची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

सलमान खान याची पोस्ट चाहत्यांना देखील प्रचंड आवजली आहे. कमेंट सेक्शनमध्ये चाहते दोघांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत आहे. संजय आणि सलमान यांच्या मैत्रीबद्दल आज सर्वांना माहिती आहे. हे फोटो समोर येताच अशी चर्चा सुरू झाली की, सलमान कदाचित संजय दत्तला उशिरा का होईना, पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेटायला गेला असावा. संजू बाबाचा वाढदिवस 29 जुलै रोजी झाला होता; त्यामुळे सलमान आपल्या या जवळच्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी गेला असावा, असं देखील सांगितलं जात आहे.

सलमान खान – संजय दत्त यांचे सिनेमे… 

सलमान खान – संजय दत्त यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. चाहत्यांनी देखील दोघांच्या मैत्रीला डोक्यावर घेतलं. मोठ्या पडद्यावर देखील दोघांच्या नात्याने चाहत्यांची मनं जिंकली. ‘साजन’, ‘चल मेरे भाई’ आणि ‘ये है जलवा’  यांसारख्या सिनेमात दोघे एकत्र झळकले आहेत.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता