सलमानने उडवली भाऊ सोहैल खानच्या घटस्फोटाची खिल्ली; पोटगीबद्दल म्हणाला..

सलमान खानने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने भाऊ सोहैल खानच्या घटस्फोटाची खिल्ली उडवली. इतकंच नव्हे तर घटस्फोटानंतर मिळणाऱ्या पोटगीच्या रकमेवरूनही त्याने मस्करी केली.

सलमानने उडवली भाऊ सोहैल खानच्या घटस्फोटाची खिल्ली; पोटगीबद्दल म्हणाला..
Salman and Sohail Khan and Seema Sajdeh
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 22, 2025 | 2:06 PM

कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा नवीन सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेता सलमान खान पाहुणा म्हणून पोहोचला होता. यावेळी सलमान आणि कपिल यांच्यात बरीच थट्टामस्करी झाली. सलमानने त्याचा भाऊ सोहैल खानच्या घटस्फोटाची आणि आमिर खानच्या तिसऱ्या रिलेशनशिपचीही खिल्ली उडवली. या एपिसोडमध्ये कपिलने सलमानला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला होता. त्याचं सलमानने त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं. “मी लग्न केल्याने इतर लोकांना काय फायदा होणार, हेच मला कळत नाही”, असं सलमान म्हणाला. यावेळी सलमानने मस्करीत घटस्फोटानंतर मिळणाऱ्या पोटगीच्या रकमेवरही कमेंट केली.

“आजकाल छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही घटस्फोट होतो. झोपेत घोरण्यामुळेही घटस्फोट होतो. घटस्फोट तरी चला ठीक आहे, पण मग ती मुलगी अर्धे पैसे घेऊन जाते”, अशी टिप्पणी सलमान करतो. हे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. यावेळी तो त्याचा भाऊ सोहैल खानच्या घटस्फोटाबद्दलही व्यक्त होतो. तो हसत हसत पुढे म्हणतो, “ती पण पळून गेली.” यानंतर कपिलसह प्रेक्षक आणि परीक्षकसुद्धा पोट धरून हसू लागतात. सोहैल खान आणि सीमा सजदेहने 1998 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 24 वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता.

या एपिसोडमध्ये सलमानने आमिर खानच्या रिलेशनशिपचीही खिल्ली उडवली. आमिर सध्या गौरी स्प्रॅटला डेट करतोय. आपल्या साठाव्या वाढदिवशी त्याने याबद्दलची कबुली दिली होती. विविध कार्यक्रमांमध्येही आमिर आणि गौरी एकत्र दिसले. नुकत्याच पार पडलेल्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला आमिर आणि गौरी एकमेकांचा हात घट्ट धरून फोटोसाठी पोझ देताना दिसले.

यावेळी कपिल शर्मा हसत सलमानला विचारतो, “आमिर भाईने त्यांच्या गर्लफ्रेंडची भेट तुम्हा सर्वांशी करून दिली. ते थांबत नाहीयेत आणि तुम्ही (लग्न) करतच नाही आहात.” त्यावर सलमान त्याच्याच अंदाजात उत्तर देतो. “आमिरची गोष्टच वेगळी आहे. तो परफेक्शनिस्ट आहे. जोपर्यंत तो लग्नाला एकदम परफेक्ट करत नाही..” असं तो म्हणताच सर्वजण जोरजोरात हसू लागतात. यावेळी सलमानसुद्धा खळखळून हसतो.