AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जोवर तो लग्न..; सलमान खानने उडवली आमिरच्या तिसऱ्या रिलेशनशिपची खिल्ली

कॉमेडियन कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिझनचा पहिलाच पाहुणा अभिनेता सलमान खान ठरला आहे. या एपिसोडचा रंजक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जोवर तो लग्न..; सलमान खानने उडवली आमिरच्या तिसऱ्या रिलेशनशिपची खिल्ली
Aamir Khan with Gauri Spratt and Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 19, 2025 | 9:31 AM
Share

कॉमेडियन कपिल शर्माचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा हा तिसरा सिझन असून त्याच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अभिनेता सलमान खानने हजेरी लावली आहे. सलमान आणि कपिल एकाच मंचावर आल्यानंतर खूप मजामस्करी होईल, यात काही शंकाच नाही. याचा अंदाज या एपिसोडचा प्रोमो पाहूनच येतोय. कपिलच्या या शोच्या पहिल्या एपिसोडचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या एपिसोडमध्ये सलमानने आमिर खानच्या रिलेशनशिपचीही खिल्ली उडवील आहे.

काही दिवसांपूर्वी सलमानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फारशी कमाई केली नव्हती. आता कपिलच्या शोमध्ये तो ‘सिकंदर’च्या वाईट कमाईबद्दलच मस्करी करताना दिसणार आहे. या शोमध्ये हुबेहूब सलमानसारखा दिसणारा एक व्यक्ती येतो. ‘तेरे नाम’ या चित्रपटात सलमानचा जसा लूक असतो, त्याच लूकमध्ये ही व्यक्ती सर्वांसमोर येते. त्याला पाहून सलमान विचारतो, “काम धंदा चांगला चालतोय का? ‘सिकंदर’मुळे काही फरक तर पडला नाही ना?” स्वत:च्याच चित्रपटावरून मस्करी करताना सलमान जोरजोरात हसू लागतो. त्याला पाहून कपिलसह उपस्थित प्रेक्षकसुद्धा पोट धरून हसू लागतात.

यानंतर सलमान कपिलच्या शोमध्ये आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट यांच्या रिलेशनशिपवरही टिप्पणी करतो. कपिल शर्मा हसत सलमानला विचारतो, “आमिर भाईने त्यांच्या गर्लफ्रेंडची भेट तुम्हा सर्वांशी करून दिली. ते थांबत नाहीयेत आणि तुम्ही (लग्न) करतच नाही आहात.” त्यावर सलमान त्याच्याच अंदाजात उत्तर देतो. “आमिरची गोष्टच वेगळी आहे. तो परफेक्शनिस्ट आहे. जोपर्यंत तो लग्नाला एकदम परफेक्ट करत नाही..” असं तो म्हणताच सर्वजण जोरजोरात हसू लागतात. यावेळी सलमानसुद्धा खळखळून हसतो.

आमिर खान सध्या गौरी स्प्रॅटला डेट करत आहे. आपल्या साठाव्या वाढदिवशी आमिरने त्याच्या रिलेशनशिपचा खुलासा केला होता. त्याने सलमान आणि शाहरुख खानशी गौरीची भेटसुद्धा करून दिली होती. याआधी आमिरने दोनदा लग्न केलंय. त्याने रीना दत्ताशी पहिलं आणि किरण रावशी दुसरं लग्न केलंय. या दोघींना त्याने घटस्फोट दिला आहे.

कपिल शर्माचा हा शो नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुरू होत आहे. येत्या 21 पासून दर शनिवारी रात्री 8 वाजता या शोचा नवीन एपिसोड स्ट्रीम होईल. यंदाच्या सिझनमध्ये नवज्योत सिंह सिद्धूसुद्धा कमबॅक करत आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.