Salman Khan: सलमान खानचा पर्दाफाश, ‘तो गर्लफ्रेंडला शिविगाळ करायचा… मारहाण करायचा आणि…’

Salman Khan: अभिनेता सलमान खान याच्यावर अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. आता भाईजान याच्या जवळच्या व्यक्तीने धक्कादायक खुलासा केला आहे. म्हणाला, 'तो गर्लफ्रेंडला शिविगाळ करायचा... मारहाण करायचा आणि...'

Salman Khan: सलमान खानचा पर्दाफाश, तो गर्लफ्रेंडला शिविगाळ करायचा... मारहाण करायचा आणि...
अभिनेता सलमान खान
| Updated on: Feb 10, 2026 | 9:18 AM

Salman Khan: अभिनेता सलमान खान फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. आज वयाच्या 60 व्या वर्षी देखील सलमान खान एकटाच आयुष्य जगत आहे. पण अभिनेत्याच्या आयुष्यात कधी प्रेमाची एन्ट्री झाली नाही… असं काहीही नाही. अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींना सलमान खान याने डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत भाईजानचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सलमान खान याच्या जवळच्या मित्राने अभिनेत्याच्या खासगी आयुष्याचा पर्दाफाश केला आहे. सलमान खान याने एक्स – गर्लफ्रेंडला शिवीगाळी केली आणि मारहाण देखील केल्याचं भाईजानच्या मित्राने सांगितलं आहे.

सलमान खान याचा जवळचा मित्र दुसरा तिसरा कोणी नाही तर, राजू श्रेष्ठ आहे. दोघे वांद्रे याठिकाणी एकत्र मोठे झालं… सलमान खान याच्याबद्दल राजू म्हणाला, ‘सलमान खान कायमच बेपरवाह आणि मोकळ्या मनाचा राहिला… आजही तो असाच आहे… ‘

सलमान खान याने गर्लफ्रेंडच्या बिल्डिंगखाली घातलेला गोंधळ

राजू म्हणाला, ‘सलमान खान याने त्याच्या आयुष्यात आलेल्या महिलांसोबत गैरवर्तन केलं आहे…’, पुढे मित्राची बाजू सांभाळत राजू म्हणाला, ‘सलमान याचं कधीच त्याच्या भावनांवर नियंत्रण नव्हतं… कधी – कधी कोणाच्या बिल्डिंग खाली उभा राहून तो शिवीगाळ करायचा…तो एक्स गर्लफ्रेंडच्या इमारतीखाली उभा राहिला आणि ओरडायचा, त्याने कोणाला तरी मारहाण केली, तो त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही. तो खूप चांगला माणूस आहे. तो मनापासून वागतो, डोक्याने नाही.’

ती ऐश्वर्या राय होती का? असा देखील प्रश्न राजू याला विचारण्यात आला. यावर त्याने कोणत्या अभिनेत्रीचं नाव घेतलं नाही. पण रिपोर्टनुसार, सलमान खान याने 2002 मध्ये एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या राय याच्या ब्रेकअपनंतर मोठा गोंधळ घातला होता.

सलमान खान – ऐश्वर्या राय

सलमान खान – ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमातून दोघांच्या नात्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगू लागल्या. खुद्द सलमान खान याने देखील अनेकदा ऐश्वर्या हिच्यासोबत ब्रेकअपवर वक्तव्य केलं आहे. सलमान खान याच्यापासून वेगळी झाल्यानंतर ऐश्वर्या हिने अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केलं. पण सलमान खान आजही अविवाहित आहे.