
Salman Khan – Aishwarya Rai : अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. अनेक वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं पण त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. आता ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी दोघांबद्दल मोठा खुलासा केला. सांगायचं झालं तर, ऐश्वर्या आणि हिमानी यांनी ‘आ अब लौट चलें’ आणि ‘हमारा दिल आपके पास है’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत हिमानी यांनी ऐश्वर्या आणि सलमान यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
हिमानी शिवपुरी म्हणाल्या, ‘हमारा दिल आपके पास है’ सिनेमाचं शुटिंग हैदराबाद याठिकाणि सुरु होतं. तेव्हा ऐश्वर्या आणि सलमान यांचं नातं फार चांगलं होतं. ऐश्वर्या उच्च शिक्षित होती. तिच्यासोबत बोलायला मला प्रचंड आवडायचं… आम्ही फिल्म सीटीमध्ये शूट करत होतो. ऐश्वर्या आणि अभिषेक दिग्दर्शक रोहन सिप्पी यांच्या सिनेमाचं शुटिंग करत होते. तेव्हा अचानक सलमान आला… तो रागातच होता… सलमान मला म्हणाला, ‘तिला सांगा स्वतःला जास्तच सुंदर समजते…’ तेव्हा मी त्याला सांगितलं शांत हो… हैदराबादमध्ये शुटिंग सुरु असताना रोज रात्री सलमान खान यायचा आणि सकाळी निघून जायचा… असं देखील हिमानी म्हणाल्या.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी संजय लीला भन्साळी यांच्या “हम दिल दे चुके सनम” सिनेमात एकत्र काम केलं होतं. असं म्हटलं जातं की त्यांनी या सिनेमाच्या सेटवर डेटिंग सुरू केली. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर ऐश्वर्याने सलमान पासून दूर होण्याचा निर्णय घेतला. रिपोर्टनुसार 2002 मध्ये सलमान आणि ऐश्वर्या यांचं ब्रेकअप झालं.
सलमान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्यातीन नातं घट्ट झालं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्यचा निर्णय घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी लग्न केलं आणि 2011 मध्ये लेक आराध्या हिचं जगात स्वागत केलं. आजा ऐश्वर्या तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.
ऐश्वर्याने लग्न केलं पण सलमान खान आजही अविवाहित आहे. सलमान खान याने बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना डेट केलं. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत अभिनेत्याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही…