Salman Khan : सलमानने जे केलं, बॉलिवूडमध्ये कोणालाच जमणार नाही ! भाईजानने चक्क..

बॉलिवूडमधील दबंग स्टार सलमान खान आणि त्याचा बॉडी डबल परवेज काझी यांच्यातील घट्ट नाते नुकतेच समोर आले. सलमानने जे केलं त्याचीच सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे,

Salman Khan : सलमानने जे केलं, बॉलिवूडमध्ये कोणालाच जमणार नाही ! भाईजानने चक्क..
Actro Salman Khan
| Updated on: Aug 25, 2026 | 2:13 PM

फिल्मी दुनियेत सेलिब्रिटी आणि त्यांच्या बॉडी डबलचं नातं फक्त कॅमेऱ्यापुरतं, एकसारखं दिसण्यापुरतं मर्यादित नसतं. बराच काळ एकत्रितपणे काम केल्यानंतर अनेकाद हे नातं कुटुंबासारखं होतं. बॉलिवूडचा ‘दबंग स्टार’ सलमान खान (Salman Khan ) हा भाईजान म्हणूनही प्रसिद्ध आहे. अनेकदा तो लोकांच्या मदतीसाठी धावून जाताना दिसतो. सलमान आणि त्याचा बॉडी डबल,परवेज काझी यांच्यात खास लगाव दिसतो. हाच परवेज संकटात सापडल्यावर भाईजनाने स्वत: मदतीचा हात पुढे केल्याचे समोर आलं. काझी हा आजारी पडला होता आणि त्याची छोटीशी हार्ट सर्जरी झाली. त्याची तब्येत बिघडल्यावर खुद् सलमान हा त्याच्यासोबत खंबीरपण उभा होता, त्यामुळे त्यांचं नातं , सलमानची मदत करण्याची वृत्ती पुन्हा चर्चेत आली.

परवेज काझीची बिघडली तब्येत

मिळालेल्या माहितीनुसार, सलमानचा बॉडी डबल असलेल्या परवेज काझीची तब्येत 6 ऑगस्ट रोजी अचानक बिघडली. सुरुवातीला शूटिंगदरम्यान त्याला हार्ट अटॅक आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, त्याच्या मॅनेजरने हा दावा फेटाळून लावला. परवेजला घरीच अस्वस्थ वाटत होते, नंतर त्याला तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात विविध वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेतलं. त्याच्यावर हृदयाशी संबंधित छोटी शस्त्रक्रियाही करण्यात आली. सध्या परवेजची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्याला काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

तब्येतीबद्दल समजताच मदतीला धावला सलमान

परवेजचे मॅनेजर पीयूष यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानला परवेजच्या प्रकृतीबद्दल कळताच त्याने तातडीने मदतीचा हात पुढे केला. उपचारासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची सलमानने स्वतः काळजी घेतली. एवढंच नव्हे तर तो स्वत: परवेजच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला. सलमान हा परवेजला आपल्या धाकट्या भावाप्रमाणे मानतो, असंही मॅनेजरने सांगितले. सध्या परवेजची तब्येत ठीक असून डॉक्टरांनी त्याला काही काळ आरामाचा सल्ला दिला आहे.

अनेक वर्षांपासून सलमानसोबत केलं काम

परवेज काझी हा गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानचे बॉडी डबल म्हणून काम करतोय. ‘प्रेम रतन धन पायो’, ‘सुलतान’, ‘टायगर जिंदा है’, ‘रेस 3’, ‘भारत’, ‘दबंग 3’ आणि ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने सलमानची भूमिका बॉडी डबल म्हणून साकारली आहे. त्याचा चेहरा मिळताजुळता सलमानशी असल्याने परवेजची सोशल मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीमध्येही स्वतंत्र ओळख निर्माण झाली.

 

Follow Us